श्रीरामाचे हे 5 गुण जीवनात अमलात आणा, यशस्वी व्हा

गुरूवार, 7 एप्रिल 2022 (17:48 IST)
प्रभू श्रीरामांनी विपरित परिस्थितीमध्ये देखील धोरण सोडले नाही. त्यांनी वेद व मर्यादा पाळत सुखी राज्याची स्थापना केली. स्वत:च्या भावना आणि सुखांसोबत तडजोड करत न्याय आणि सत्याचे समर्थन केले. मग राज्य त्याग, बाली वध, रावण संहार किंवा सीतेला वन पाठवण्याचा प्रसंग का नसो, त्यांनी धैर्य ठेवून सर्व पार पाडले. त्याच्या जीवनातील 5 गुण अमलात आणून यशस्वी होता येऊ शकतं-
 
सहनशील व धैर्यवान
सहिष्णुता आणि संयम हा भगवान रामाचा एक विशेष गुण आहे. कैकेयीच्या आदेशानुसार, 14 वर्षे जंगलात घालवणे, समुद्रावर सेतु निर्माणासाठी तपस्या करणे, सीतेचा त्याग केल्यानंतर राजा असून संन्यासी प्रमाणे जीवन व्यतीत करणे हे त्यांच्या सहनशीलता आणि धैर्याचे गुण दर्शवतं.
 
दयाळू आणि योग्य स्वामी
प्रभू राम यांनी दया दाखवत सर्वांना आपल्या छत्रछायेत जागा दिली. त्यांच्या सेनते पशु़ मानव, दानव सर्व प्रकारे होते त्यांनी सर्वांना पुढे वाढण्याची संधी दिली. सुग्रीवला राज्य, हनुमान, जाम्बवंत व नल-नील यांना देखील त्यांना वेळोवेळी नेतृत्व करण्याचा हक्क दिला. मित्र केवट असो वा सुग्रीव, निषादराज असो वा विभीषण. प्रत्येक जाती, प्रयत्येक वर्गाच्या मित्रांसह प्रभू रामाने ‍हृद्याने नाते जपले. मित्रांसाठी स्वत:ने संकट ओढून घेतले.
 
उत्तम व्यवस्थापक
भगवान राम केवळ एक कुशल व्यवस्थापक नव्हते, तर सर्वांना सोबत घेऊन जाणार होते. ते प्रत्येकाला विकासाची संधी देत असून उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर करत होते. त्यांच्या या गुणांमुळे लंका जाण्यासाठी त्यांनी व त्यांच्या सेनेने दगडांचा पूल तयार केला होता.
 
आदर्श भाऊ
भगवान रामाचे तीन भाऊ लक्ष्मण, भरत व शत्रुघ्न सावत्र आईचे पुत्र होते तरी त्यांनी आपल्या सर्व भावांप्रती सख्खया भावांपेक्षा अधिक त्याग, समर्पण आणि प्रेमाचा भाव ठेवाला. या कारणामुळेच जेव्हा श्रीराम वनवासासाठी निघून गेले तेव्हा लक्ष्मण त्यांच्यासोबत त्यांची सेवा करण्यासाठी गेले आणि रामाच्या अनुपस्थितीमध्ये राजपाट मिळाल्यावर देखील भरताने प्रभू रामाचे मूल्य समजून सिंहासनावर त्यांच्या चरण पादुका ठेवून जनतेला न्याय दिलं.
 
भरतासाठी आदर्श भाऊ, हनुमानासाठी स्वामी, प्रजेसाठी नीति-कुशल व न्यायप्रिय राजा, सुग्रीव व केवटसाठी परम मित्र आणि सेनासोबत घेऊन चालणार्‍या व्यक्तिमत्व म्हणून रामाला ओळखलं जातं. त्यांच्या या सद्गुणांमुळेच त्यांना मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणून पूजलं जातं. हे देखील खरे आहे की एखाद्याचे गुण आणि कर्म यामुळे त्याची ओळख होते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती