1 योजना मजबूत करा - आचार्य चाणक्य यांचे मते, कोणतेही कार्य करण्यापूर्वी त्याची ठोस योजना आखावी आणि त्या योजनेची मुळातून योग्य अमलबजावणी करावी. तरच त्या व्यक्तीला कामात यश मिळू शकतं. नियोजन न करता काम करणं अपयशी ठरतं.
2 आपल्या नीती किंवा धोरणांना सामायिक करू नये - कोणते ही काम सुरू करण्यापूर्वी आपली धोरणे सामायिक करू नये याला एखाद्या गुपित प्रमाणे लपवावे. वास्तविक चाणक्याचा धोरणानुसार जर एखाद्या विश्वासघाती किंवा आपल्या शत्रूला आपली कार्य नीती कळल्यावर हे आपल्यासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकत. म्हणून नेहमी हे लक्षात ठेवा की आपल्या नीती कोणालाही सांगू नये.
3 विश्वासू लोकांना जवळ बाळगा - आचार्य चाणक्य आपल्या नीतीमध्ये सांगतात की नेहमी आपल्यासह विश्वासू लोकांना ठेवा. ज्यांच्यावर आपल्याला विश्वास नाही त्यांच्यावर कधीही कामाची जवाबदारी टाकू नये. जबाबदारीचे काम नेहमी विश्वासू माणसांकडूनच करवावे. तसेच ज्या माणसाला आपण विश्वासू समजत आहात त्यांचा विश्वासू होण्याची तपासणी वेळोवेळी करत रहावी.
4 धोरण ठेवून पैसे खर्च करावे - काही लोक आपल्या प्रयत्नाने पैसे मिळवतात. तर काहींना वडिलोपार्जित संपत्ती मिळते. पण दोन्ही परिस्थितीमध्ये माणूस श्रीमंत तेव्हाच होतो जेव्हा तो समजूतदारीने पैसे खर्च करत असतो. एखाद्या कामाच्या सुरुवातीस हे लक्षात ठेवणं फार महत्त्वाचे आहे की पैशाचा वापर हुशारीने करावा अन्यथा या मुळे भविष्यात काळजी ची बाब होऊ शकते.
5 स्रोतांचा वापर पुरेपूर करावे - चाणक्याचा मते, स्रोतांचा वापर पुरेपूर करावा आणि याला आपले उद्देश बनवावे. जर आज आपण आपल्या स्रोतांचा योग्य वापर केला नाही तर उद्याच्या तोटा सहन करण्यासाठी तयार राहावे. एक यशस्वी माणूस नेहमी आपल्या स्रोतांचा वापर पुरेपूर करतो.