ग्रहांचे खडे का धारण करतात?

विवाह होत नसेल तर 'पुखराज', मंगळ असेल तर पोवळा व तापट स्वभाव असेल तर मोती धारण करावा. पण कोणते रत्न कधी धारण करावे, याचे ज्ञान आपल्याला नसते. त्यामुळे कितीही ग्रहांचे खडे धारण केले तरी त्याचा फायदा होत नाही. ग्रहांचे खडे का व कधी धारण करावे? यासाठी आधी आपल्या कुंडलीचे सूक्ष्म निरीक्षण करणे गरजेचे आहे. लग्न कुंडली, नवमाश, ग्रहांचे बलाबल, दशा-महादशा आदींचा अभ्यास करून रत्न धारण करण्‍याचा सल्ला दिला जातो. विनाकारण रत्न धारण केल्याने ते नुकसानदायकही ठरू शकते.

मोती निराशाही देऊ शकतो. पोवळा रक्तदाब वाढवू शकतो तर पुखराज अहंकार निर्माण करू शकतो.

सामान्यत: लग्न कुंडलीनुसार लग्न, नवम, पंचम रत्न धारण केले जाऊ शकतात. जे ग्रह शुभ भावाचे स्वामी असून पापाचा प्रभाव कमी करणारे असतात. श‍त्रुची कार्यक्षमता कमी करण्यासाठी कुंडली पाहूनच रत्न धारण करणे प्रभावशाली होत असते.

रत्न धारण करण्‍यापूर्वी दशा-महादशांचा अभ्यास आवश्यक असतो. केंद्र अथवा त्रिकोणाच्या स्वामीचा ग्रह ,महादशेत त्याच ग्रहाचा रत्न धारण करणे अधिक लाभदायी असते.

3, 6, 8, 12 चे स्वामी ग्रहांचे रत्न धारण करू नये. त्यांना शांत करण्यासाठी दान-मंत्र जपाचा आधार घ्यावा लागत असतो. रत्न निर्धारित केल्यानंतर त्याला धारण करण्‍याचाही एक विशिष्ट प्रकारचा विधी असतो. रत्न किंवा खडे हे अंगठी किंवा लॉकेटमध्ये सोने, चांदी, तांबे अथवा पितळ अशा धातूंमध्ये धारण करावे.

ग्रहासाठी शुभ असलेल्या दिवशी शुभ मुहुर्तावर रत्न धारण केले जाते. रत्न धारण करण्‍यापूर्वी कच्च्या दुधात दोन दिवस अगोदर टाकून ठेवावा. शुभ मुहुर्तावर ग्रहाचा मंत्र जप करून रत्नाचे शुध्दीकरण करावे. त्यानंतर परमेश्वराचे स्मरण करून रत्नावर अगरबत्ती ओवाळून प्रसन्नचित्ताने धारण करावा. अशा पध्दतीने रत्न धारण केला तर त्याचे पूर्ण फळ मिळते. मंत्र जप व रत्न शुध्दी करण्‍यासाठी ज्योतिष पंडित मदत घेतली जाऊ शकते.

शनी व राहु रत्ने कुंडलीचे सूक्ष्म निरिक्षण केल्यानंतरच धारण करावा अन्यथा भयंकर नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती