आहाराप्रती सजग राहा
धावपळीच्या नादात सर्वात अधिक दुर्लक्ष होतं ते आहाराकडे. नियमित वेळी आहार न घेतल्याने प्रेतदोष लागतो, पितृदोष लागतो आणि आपण आजारी होऊ शकता. याने धनाचे हनन होऊ शकतं. स्थिर स्थानी बसून शांतपणे आहार घेतल्याने देवता प्रसन्न होतात, राहू दोष कमी होतं ज्याने प्रगती होते.
घरी येताना रिकाम्या हाती येऊ नये
घरातून रोज बाहेर पडत असाल तेव्हा घरी परत येताना रिकाम्या हाती येऊ नाही. रोज घरी येताना काही लहानशी का नसो पण खरेदी करत आल्यास घरात बरकत राहते, कटकटी दूर होता आणि घरात प्रेमाचे वातावरण राहतं.