मंगळ दोष दूर करण्यासाठी या 11 पैकी एक उपाय

शास्त्रांप्रमाणे मंगळवारी केलेले उपाय विशेष फळ प्रदान करतात. कारण मंगळवार हनुमानाचा वार असतो आणि मंगळ देवतेच्या पूजन करण्याचा दिवस असतो. म्हणून जीवनात येत असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी मंगळवारी काही उपाय केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. तर जाणून घ्या काही सोपे उपाय आणि यातून आपल्या सोयीप्रमाणे उपाय करून जीवनातील संकट दूर करावे.
 
 
* या दिवशी कृष्णाचे श्रद्धापूर्वक पूजन करावे.
 
* कृष्णाचा एक फोटो तुळशीच्या झाडाजवळ स्थापित करावा.
 
* तुळशीच्या माणकांची माळ घालावी.
 
* मंगळ दोष असणार्‍या व्यक्तीने आपलं घर बनवताना त्यात लाल रंगाचा दगड लावला पाहिजे. आपण घरात या रंगाचा दगड ठेवू देखील शकता.
 
* तुळशीच्या झाडाजवळ दररोज तुपाचा दिवा लावावा.
 
* माकडांना गूळ आणि चणे खाऊ घालावे.
 
* ज्यांच्या कुंडलीत मंगळ दोष आहे त्यांनी दररोज किंवा दर मंगळवारी शिवलिंगावर कुंकू चढवावे.
 
* आपल्या घरात लाल फुलं असलेल्या झाडाची विशेष काळजी घ्यावी किंवा घरात असे झाड लावावे ज्याला लाल रंगाचे फुलं येत असतील.
 
* यासोबतच महादेवाच्या पिंडीवर लाल मसूर डाळ आणि गुलाबाचे फुलं अर्पित करावे. याने मंगळ दोष शांती होते.
 
* लाल कपड्यात मसूर डाळ, रक्त चंदन, रक्त पुष्प, मिष्टान्न आणि द्रव्य गुंडाळून नदीत प्रवाहित केल्याने मंगळ निगडित दोष दूर होतात.
 
* मंगळाच्या दुष्प्रभावापासून बचावासाठी उपाय म्हणून मंगळवार हा दिवस, मंगळ नक्षत्र (मृगशिरा, चित्रा, धनिष्ठा) आणि मंगळाची होरा शुभ असतात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती