Mangal Rashi Parivartan 2022:जेव्हा एखादा ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत जातो तेव्हा त्याचा सर्व राशींवर परिणाम होतो. जून महिन्यात अनेक मोठ्या ग्रहांच्या राशीत बदल होतील. त्यापैकी मंगळ हा मुख्य ग्रह आहे. 27 जून रोजी सकाळी 5:39 वाजता मंगळ मीन राशीतून निघून मेष राशीत प्रवेश करेल. मंगळ हा धैर्य, पराक्रम आणि व्यवसायाचा कारक मानला जातो. मंगळ परिवर्तनाच्या प्रभावामुळे चार राशींच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. जाणून घ्या या राशींबद्दल-