पत्रिकेत असतात हे 9 प्रकारचे दोष, 1 ही असेल तर मिळतात वाईट परिणाम
ज्योतिषानुसार व्यक्तीच्या पत्रिकेत बरेच दोष असतात. पण अशुभ दोष असल्यामुळे व्यक्तीला बर्याच अडचणींना तोंड द्यावे लागतात. तर जाणून घेऊ पत्रिकेत असणार्या या दोषांबद्दल.
शनी दोष
पत्रिकेत जर शनी दोष असेल तर हा दोष फारच अशुभ दोष मानला जातो. हा दोष असल्यामुळे व्यक्तीला समाजात अपमानित व्हावे लागत. शनी दोष असल्यामुळे अपयश, नोकरी आणि व्यापारात नुकसान उचलावे लागतात.
मांगलिक दोष
जेव्हा पत्रिकेत लग्न भाव, चवथा भाव, सातवा भाव, आठवा आणि दहाव्या भावात मंगळ स्थित असेल तेव्हा पत्रिकेत मंगळ दोष येतो. मंगळ दोषामुळे व्यक्तीला विवाहासंबंधित अडचणी, रक्त संबंधित आजार आणि भूमी भवन संबंधीत समस्या येतात.
कालसर्प दोष
राहू केतूमुळे कालसर्प दोष बनतो. पत्रिकेत कालसर्प दोष निर्माण झाल्याने जातकाला संतानं आणि धन संबंधी त्रास होऊ लागतो आणि जीवनात चढ उतार येऊ लागतात.
प्रेत दोष
पत्रिकेच्या पहिल्या भावात चंद्रासोबत जर राहूची युती असेल आणि पंचम व नवम भावात एखादा क्रूर ग्रह स्थित असेल तर त्या जातकावर भूत प्रेत किंवा वाईट आत्मेच प्रभाव राहतो.
पितृदोष
पत्रिकेत पितृ दोष तेव्हा असतो जेव्हा सूर्य, चंद्र, राहू किंवा शनीमध्ये कोणतेही दोन ग्रह एकाच घरात उपस्थित असतात. पितृदोष असल्याने संतानं संबंधी बरेच त्रास होण्याची शक्यता असते. मान्यतेनुसार पितरांचे दाह संकार योग्य प्रकारे केले नाही तर पितर रागावतात ज्यामुळे जातकाला त्रास होऊ लागतो.
चाण्डाल दोष
जातकाच्या पत्रिकेत गुरु राहूची युती असल्यास चाण्डाल दोषाचा निर्माण होतो. हा दोष असल्याने व्यक्ती वाईट संगतीचा आहारी जातो.
ग्रहण दोष
हो दोष तेव्हा येतो जेव्हा सूर्य किंवा चंद्राशी युती राहू किंवा केतूत होते. ग्रहण दोष असल्याने व्यक्तीचा मनात नेमही भिती निर्माण होते. या दोषामुळे व्यक्ती नेहमी आपल्या कामाला अर्धवट सोडून नवीन कामाबद्दल विचार करू लागतो.
अमावस्या दोष
ज्योतिष शास्त्रात चंद्राला पत्रिका तयार करताना लक्षात ठेवले जाते. चंद्राला मनाचा कारक मानण्यात येतो. सूर्य आणि चंद्र दोन्ही एकाच घरात असल्यास अमावस्या दोष तयार होतो. पत्रिकेत हा दोष बनल्यास त्या जातकाच्या कुंडलीत चंद्र क्षीण आणि प्रभावहीन राहतो. अमावस्या दोष असल्यास व्यक्तीला बर्याच अडचणींना तोंड द्यावे लागते.
केमद्रुम दोष
हा दोष चंद्राशी निगडित असतो. जेव्हा चंद्र तुमच्या पत्रिकेत ज्या घरात असतो त्याच्या पुढच्या व मागच्या घरात कुठले ही ग्रह नसतील तर पत्रिकेत केमद्रुम दोष निर्माण होतो.