ठेवा खिशात चांदीचा तुकडा आणि पाहा चमत्कार !

रविवार, 22 मे 2022 (13:15 IST)
रत्नांप्रमाणेच धातू देखील शुभ आणि अशुभ प्रभाव देतात. ते परिधान केले किंवा त्यांच्याशी संबंधित उपाय केले तर परिणाम लवकर दिसून येतात.लाल किताबातही सोने, चांदी, तांबे, पितळ, लोखंड इत्यादी धातूंशी संबंधित उपाय व युक्त्या सांगण्यात आल्या आहेत. या चांदीच्या चौकोनी तुकड्यांशी संबंधित काही उपाय देखील आहेत. हे उपाय खूप प्रभावी आहेत. 
 
चांदीचा तुकडा खिशात किंवा तिजोरीत ठेवण्याचे फायदे 
लाल किताबात खिशात किंवा घराच्या तिजोरीत चांदीचा चौकोनी तुकडा ठेवण्याचा सल्ला दिला जातो. हा उपाय खूप उपयुक्त आहे. त्यामुळे घरात पैशाची आवक वाढते आणि नोकरी-व्यवसायात खूप प्रगती होते. 
खिशात चांदीचा चौकोनी तुकडा ठेवल्याने कर्मातील दोष दूर होतात आणि व्यक्तीला त्याच्या कर्मांचे शुभ फळ मिळू लागतात. 
चांदीचा संबंध शुक्र ग्रहाशी आहे आणि शुक्र हा सर्व भौतिक सुख, समृद्धी, प्रणय यांचा कारक आहे. अशा स्थितीत चांदीचा तुकडा ठेवताच शुक्र ग्रह शुभ परिणाम देऊ लागतो आणि व्यक्तीच्या जीवनात सुख आणि धनाची वृद्धी होते. 
चांदीचा चौकोनी तुकडा ठेवल्याने कुंडलीतील चंद्रही बलवान होतो. यामुळे मानसिक शक्ती मजबूत होते, व्यक्ती योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यास सक्षम होते. 
चांदीमुळे संपत्ती वाढते. यामुळे व्यवसायातील सर्व अडथळे दूर होतात. नोकरदार लोकही खिशात चांदीचा चौकोनी तुकडा ठेवल्याने जलद प्रगती होते. 
तिजोरीत चांदीचा चौकोनी तुकडा ठेवल्याने लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. घरात धनाची आवक वाढते. 
 
(अस्वीकरण: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. वेबदुनिया याची पुष्टी करत नाही.)

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती