Planetary Indications for life: ग्रहांच्या शुभ अशुभ स्थितीचे संकेत
गुरूवार, 25 जून 2020 (12:11 IST)
ग्रहांचा शुभ अशुभ स्थितीचे संकेत आपल्याला आपल्या जीवनापासून मिळतात एक दृष्टी आपण आपल्या स्वतःवर, आपल्या व्यवहारावर आणि आपल्या जीवनावर टाकू आणि ग्रहांची स्थिती जाणून घेऊया......
सूर्य - ज्या लोकांचा जन्मकुंडलीमध्ये हा ग्रह शुभ स्थितीमध्ये असतो, त्यांना कुटुंबात आणि समाजात सन्मान मिळतो. हा ग्रह अशुभ असल्यास डोळ्यांशी निगडित त्रास उद्भवतो, आदर मिळत नाही.
चंद्र - कुंडलीत चंद्राची स्थिती शुभ असल्यास माणूस मानसिकरीत्या स्थिर असतो. चंद्र अशुभ असल्यास माणसाचे मन चंचल असते आणि त्यास मानसिक ताण असतो.
मंगळ - हा ग्रह शुभ असल्यास माणसाला जमिनीशी निगडित कामामध्ये फायदा होतो. आईचा पाठिंबा असतो. जर हा ग्रह अशुभ आहे तर लग्नानंतर समस्या उद्भवतात. रक्तासंबंधित काहीही आजार उद्भवतात.
बुध - हा ग्रह शुभ असल्यास माणसाचे मेंदू तल्लख असतं आणि हे अशुभ असल्यास माणूस बुद्धीशी संबंधित कामामध्ये यश मिळवू शकत नाही.
गुरु - गुरु ग्रह शुभ असल्यास माणूस धार्मिक कार्यात व्यस्त असतो. शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये नफा मिळवतो. या ग्रहाचे अशुभ असल्यावर नशिबाची साथ मिळत नाही. कठोर परिश्रमानंतरच एखाद्या कामामध्ये यश मिळतं.
शुक्र - हा ग्रह शुभ असल्यास माणसाला सर्व शारीरिक सुख सुविधा मिळतात. माणूस सुख सोयीने राहतो. आणि हा अशुभ असल्यास माणसाचे वैवाहिक जीवन त्रासलेले असतं.
शनी - ज्यांचा शनी शुभ आहे, त्यांना मशीनच्या निगडित कामात जास्त नफा मिळतो आणि शनी अशुभ असला तर अडचणींना सामोरी जावे लागते. वाहनांचे नुकसान होऊ शकतं.
राहू -केतू - ज्या लोकांच्या कुंडलीत हे शुभ स्थितीमध्ये असतात ते रहस्यमय असतात आणि बरेच यश मिळवतात आणि हे ग्रह अशुभ असल्यास माणसाचे मानसिक संतुलन ढासळत. ती नशेला बळी पडू शकते.