तळहातावर तीळ आणि आमच्या जीवनावर त्याचा प्रभाव

शनिवार, 16 मार्च 2019 (00:29 IST)
हस्तरेखा ज्योतिष्यानुसार तळहातावरच्या रेषा बनतात बिघडत राहतात, कधी कधी तळहातावर काळे तीळ बनून 
जातात. तळहातावरच्या वेग वेगळ्या भागांवर बनणारे तीळ वेग वेगळ्या गोष्टींची भविष्यावाणी करतात. येथे जाणून घ्या तळहातावरचे तीळ आणि त्याच्याशी निगडित त्यांचे परिणाम .… 
 
1. तळहातावरच्या शुक्र पर्वतावर तीळ असल्याने व्यक्तीच्या विचारांमध्ये पवित्रता राहत नाही.
 
2. ज्या लोकांच्या तळहातावर चंद्र पर्वतावर तीळ असेल, त्यांना पाण्या (नदी, तलाव, विहीर, समुद्र)पासून सावध राहिला पाहिजे. या लोकांच्या विवाहात उशीर होऊ शकतो.
 
3. जर गुरु पर्वतावर तीळ असेल तर लग्नात अडचणी येतात. कुठल्याही कामात योग्य यश मिळत नाही.
 
4. शनी पर्वतावर तीळ असल्याने विवाहाला उशीर होतो आणि वैवाहिक जीवन देखील संतोषप्रद राहत नाही.
 
5. सूर्य पर्वतावर तीळ असेल तर हे मान सन्मानासाठी शुभ नसते. सूर्य पर्वतावर तीळ असेल तर त्या व्यक्तीला समाजात अपमानाचा सामना करावा लागतो.
 
6. जर एखाद्या व्यक्तीच्या तळहाताच्या बुध पर्वतावर तिळाचे निशाण असेल तर त्याला अचानक नुकसान होण्याची शक्यता असते. बुध पर्वत सर्वात लहान बोटाखाली असतो. जेव्हा तळहातावर अशी स्थिती बनते तर सावधगिरीने कार्य करायला पाहिजे.
रेषांवर तीळ
1. जर जीवन रेषेवर तीळ असेल तर ते आरोग्यासाठी योग्य नसते. या रेषेवर तीळ असणे गंभीर आजार होण्याची शक्यता असते.
 
2. तळहाताच्या मस्तिष्क रेषेवर तीळ असेल तर व्यक्तीला डोक्याशी निगडित कुठले आजार होण्याची शक्यता असते.
 
3. हृदय रेषेवर तीळ असणे आरोग्यासाठी योग्य नसते.
 
4. भाग्य रेषेवर तीळ असल्याने व्यक्तीला भाग्याचा साथ मिळत नाही. अशा स्थितीत व्यक्तीला फार मेहनत करावी लागते, पण अपेक्षेप्रमाणे त्याला यश मिळत नाही.
 
5. विवाह रेषेवर तीळ असल्यास विवाह उशीरा होतो आणि वैवाहिक जीवनात अडचणी देखील येतात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती