मंगळ सातव्या घरात असल्यास ही खबरदारी घ्यावी आणि हे 5 कार्ये करावे

सोमवार, 13 एप्रिल 2020 (11:53 IST)
मकर राशीमध्ये मंगळ उच्च स्थानी आणि कर्क राशीमध्ये खालच्या स्थानाला असतो. लाल किताबाच्या मताप्रमाणे मंगळ चांगला आणि वाईट दोन्ही असतो. कुंडलीत 10 घरात मंगळ असल्यास उच्च स्थानी आणि सातव्या घरात असल्यास खालच्या स्थानाला मानला जातो. घरात निच स्थानी असल्यास काय करावे.
 
मूळ कसा असेल - 
मंगळाच्या अमलाखाली असलेले नीतिमान आणि धर्मशाला असणारे असतात. त्यांचे रक्षण स्वयं विष्णुदेव करणारे असतात. त्यामुळे हे लोक धनवान आणि न्यायप्रिय असतात. सातव्या घरात मंगळ असल्यास वैवाहिक आणि सांसारिक जीवनात अडथळे येतात.
 
 म्हणून हे करू नये -

1 पोपट- मैना सारखे कोणतेही पक्षी पाळू नये.
2 घराजवळ रिकामी विहीर असू नये.
3 बहिणी किंवा आत्या कडील काहीही स्वतःजवळ बाळगू नका.
4 मांसाहार आणि मद्यपान टाळावे. गाणं आणि नृत्याची सवय लावू नये.
5 बायकोशी संबंध सलोख्याचे असावे. खोटे वागणे आणि बोलणे टाळावे.
 
हे करावे-
1 घरात चांदी ठेवावी.
2 मावशी, बहीण, मुलगी, आत्याला मिठाई द्यावी.
3 बायकोला लाल बांगड्या आणि चांदीच्या बांगड्या घालाव्या.
4 हनुमान चालीसाचे पठण करावे.
5 शुक्र आणि बुद्धाचे उपाय करावे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती