कलात्मक मूलांक 7

मूलांक ७च्या लोकांवर मूलांक २च्या लोकांचा सर्वाधिक प्रभाव असतो आणि ते त्यांना सर्वाधिक सहकार्य करतात. ही एक आश्चर्यकारक गोष्ट आहे की, मूलांक ७च्या लोकांवर मूलांक ९च्या लोकांचाही प्रभाव असतो.

स्वरुप: मूलांक ७ असलेल्या व्यक्ती दिसायला सुंदर आणि आकर्षक असतात. त्याबाबत ते जागरुकही असतात, आपल्या रूपाची ते काळजीही घेतात. जसजसे वय वाढत जाते तसतसे त्यांचे रूप अधिकाधिक आकर्षक होत जाते. पण कधी कधी अतिकाळजी घेण्याच्या वृत्तीमुळे ते अनाकर्षकही वाटतात. 

पुढे पहा मूलांक 7चे व्यक्तिमत्व


WD


व्यक्तिमत्व: जल तत्वाच्या प्रभावामुळे मूलांक ७ असलेल्या लोकांचे व्यक्तिमत्व चंचल व सतत बदलणारे असते. त्यांच्या आवडी-निवडी, खान-पान, कपडय़ांची निवड, विचार नेहमी बदलत असतात. ही माणसे इतरांपेक्षा वेगळी असतात आणि हजारांतही ओळखता येतात. आपल्या विचारांना आणि कल्पनांना मूर्त रूप देण्यासाठी त्यांना कोणाचे तरी सहकार्य लागतेच. बाह्य सहकाऱ्याशिवाय हे लोक असहाय आणि अयशस्वी ठरतात.

संगीत आणि ललित कलांमघ्ये यांची रूचि स्पष्ट दिसते. संकुचित मनोवृत्तीपासून ही माणसं स्वतला दूर ठेवतात. परंपरावादी असूनही ते परिवर्तनशील राहतात. परंतु परिवर्तनाला सुरुवात करत नाहीत.

मूलांक ७ असलेल्या लोकांची जीवनशैली त्यांच्या आसपासच्या, कुटुंबियांतील लोकांपेक्षा उच्च पातळीवरील असते. त्यांचे मन सतत अशांत, बेचैन आणि संतप्त असते. यांच्यामध्ये एक विशेष रहस्यमय गुण लपलेला असतो. त्यांना कोणत्याही संकटाच्या पूर्वी चांगली आणि सुंदर स्वप्नं पडतात.

पुढे पहा मूलांक 7चे शिक्ष


WD


शिक्षण : शिक्षणाची त्यांना आवड असते, पण अनेकदा त्यांना शिकण्याची संधी मिळत नाही. यांना भविष्य जाणून घेण्याची खूप उत्सुकता असते. तंत्र-शास्त्र आणि ज्योतिषावर यांचा विश्वास असतो, पण आपल्या अस्थिर मनामुळे ते नेहमी ज्योतिषी बदलत असतात. काव्य, चित्रकला, संगीत, लेखनाशी संबंधित प्रतिभा यांच्यामध्ये असूनही अनेकदा ती अव्यक्त राहते.

पुढे पहा मूलांक 7चे गुण व अवगुण


WD


गुण: परिस्थितीनुसार स्वतमध्ये बदल करत राहणं हा मूलांक ७ असलेल्या लोकांचा मुख्य गुण आहे. त्यांची कलात्मक दृष्टी त्यांना स्वतंत्र तेज देते. प्रतिकूल परिस्थितीचा ते सहज स्वीकार करतात. वैचारिक चंचलता ह्या त्यांच्या गुणामुळे त्यांना ओळखले जाते.

दुर्गुण: अधीर स्वभाव, शौर्याचा अभाव आणि नेहमी इतरांवर अवलंबून राहणे हे यांचे मुख्य दुर्गुण आहेत. योग्य वेळेवर निर्णय न घेणे किंवा शेवटपर्यंत निर्णय न घेणे हे त्यांच्या अयशस्वीपणाचे प्रमुख कारण आहे.

पुढे पहा मूलांक 7चा भाग्य दिवस


WD


भाग्यशाली तिथी: प्रत्येक महिन्याची २, ४, ७, ११, १३, १६, २०, २२, २५, २९ आणि ३१ तारीख तुमच्यासाठी शुभ आहे.

भाग्य दिवस: प्रत्येक आठवडय़ातील सोमवार व रविवार तुमच्यासाठी भाग्यवान आहे. जर याच दिवशी तुमची भाग्यशाली तिथी असेल तर हा योगायोग तुमच्यासाठी शुभ ठरेल.

शुभ रंग: क्रीम, सफेद, पिवळा, गुलाबी तुमच्यासाठी भाग्यशाली आहेत. याशिवाय, विशेष कार्यासाठी फिक्कट लाल व फिक्कट पिवळा रंगही तुमच्यासाठी शुभ आहे.

पुढे पहा मूलांक 7चे भाग्यशाली वर्ष


WD
भाग्यशाली वर्ष: ७, ११, १३, १६, २०, २२, २५, २९, ३१, ३४, ३८, ४०, ४३, ४७, ५२ व ६१वं वर्ष तुमच्यासाठी अत्यंत अनुकुल व लाभदायक आहे.

भाग्यशाली देव: मूलांक ७च्या लोकांना चंद्राच्या बरोबरच गणपति आणि शंकराची आराधना केल्यास विशेष लाभ, यश , शांति व शक्ति संपादन करता येईल.

भाग्य मंत्र: ॐ सौं सोमाय नम
ॐ नम शिवाय शुभम शुभम कुरु कुरु शिवाय नम ॐ
ॐ गं गणपतये गं नम

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती