Mangal Nakshatra Parivartan 2024 असे मानले जाते की जेव्हा ग्रह किंवा नक्षत्र त्यांची राशी बदलतात तेव्हा त्याचा परिणाम पृथ्वीवरील सर्व सजीवांवर आणि मानवी जीवनावर होतो. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा ग्रह नक्षत्र बदलतात तेव्हा सर्व 12 राशींवर काही प्रमाणात परिणाम होतो. व्यक्तीच्या आयुष्यात सकारात्मक आणि नकारात्मक घटना घडू लागतात.
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जानेवारीमध्ये अनेक ग्रह आणि नक्षत्र बदलत आहेत. 14 जानेवारी 2024 रोजी रात्री 10:11 वाजता मंगळ पूर्वाषाडा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. मंगळ हा शक्ती, जमीन, वाहन इत्यादींचा कारक मानला जातो. पूर्वाषादा नक्षत्रात मंगळाच्या संक्रमणामुळे काही राशींना फायदा होणार आहे. अशात आपण जाणून घेणार आहोत की मंगळाच्या राशीत बदलामुळे कोणत्या राशींचे भाग्य उजळणार आहे.
मिथुन- मिथुन राशीचे लोक मंगळाच्या राशीत बदलामुळे भाग्यवान ठरतील. कार्यक्षेत्रात विस्तार होईल. तसेच नोकरी करणाऱ्या लोकांचे उत्पन्न वाढेल. वडिलोपार्जित मालमत्तेतून आर्थिक लाभ होईल. तुम्ही वाहन, नवीन घर आणि मालमत्ता यासारख्या भौतिक सुखसोयी खरेदी करू शकता. अभ्यास करणाऱ्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते. तब्येत सुधारू शकते.
कुंभ- वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार कुंभ राशीच्या लोकांसाठी मंगळाचा नक्षत्र बदल खूप शुभ असणार आहे. समाजात मान-सन्मान वाढेल. व्यक्तीला अचानक धनलाभ होऊ शकतो. वैवाहिक जीवनात आनंद राहील. जे अविवाहित आहेत त्यांच्यासाठी नात्याची चर्चा होऊ शकते. 14 जानेवारीनंतर घरात काही धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जाऊ शकतात.