जर सप्तम स्थाहनात शुक्र किंवा चंद्र असेल तर विवाह 24-25 वर्षात आणि शनी असेल तर विवाह 32 नंतर झालेले आढळून आले आहे. जर जन्मपत्रिकेत शनी 1, 4, 5, 9, 10 व्या भावाचा स्वामी असून सप्तममध्ये असेल आणि त्यावर गुरू किंवा शुक्राची दृष्टी पडत असेल तर लग्न लवकर होत. सप्तम भावात गुरू एकटा असेल तर लग्न उशीरा होत.
प्रेम विवाह : जर पंचम भावाचा स्वामी सप्तम भावात, लग्न किंवा व्यय भावाशी संबंध बनत असेल तर प्रेम विवाह किंवा परिचय विवाहाचा योग असतो. जर पंचमेश सप्तममध्ये किंवा सप्तमेश पंचममध्ये असेल तरी प्रेम विवाहाचा योग बनतो. जर पंचम किंवा सप्तमचा स्वामी व्यय भावात असेल तर मनाप्रमाणे विवाह होतो पण विवाह सुख मिळत नाही. जर पंचमेश किंवा सप्तमेश शुभ ग्रह असून राशी परिवर्तन करत असतील तर विवाह सुखमय आणि भाग्य वाढवणारा असतो. जर हे अशुभ ग्रह असतील तर वादविवाद कायम बनलेला असतो. सप्तमेशचे लग्नात असणेसुद्धा परिचय विवाहाचे संकेत आहे.