या 8 गोष्टींकडे मुळीच दुर्लक्ष करू नये, घडू शकतं अनिष्ट

आमच्या शास्त्रात अनेक मान्यता आहेत ज्या आम्हाला शुभ- अशुभ याबद्दल संकेत देत असतात. आम्ही विश्वास करत नसलो तरी याचे अस्तित्व नाकारता येत नाही. काही गोष्टी जुन्या काळापासून शुभ व सकारात्मक मानल्या जातात तर काही अशुभ आणि नकारात्मक. याबद्दल माहिती असल्यास आपण याच्या अशुभ प्रभावापासून वाचू शकता. जाणून घ्या 8 गोष्टी ज्या अशुभ किंवा अनिष्टाबद्दल संकेत करतात.... 
 
1 घरात जंत- घरात पतंग, पिपिलिका, मधमाशी, वाळवी आणि सूक्ष्म कीटक प्रकट होणे हे अमंगल सूचक आहे. उंदराचे अधिक उत्पात देखील शुभ नाही. आपल्या घरात किंवा घराजवळ या प्रकारे कीटक असल्यास लगेच यावर उपाय करावा.
 
2 कुत्र्याचे रडणे - संध्याकाळी कुत्रा पूर्व दिशेकडे तोंड करून रडत असल्यास हे अशुभ संकेत आहे. या व्यतिरिक्त आपण बाहेर जात असताना कुत्रं आपल्या मागे चालत असल्यास हे देखील अनिष्टाचे लक्षण आहे. 
 
3 डोळा फडफडणे - पुरुषांचा डावा आणि महिलांचा उजवा डोळा फडफडणे अशुभ मानले गेले आहे. जर आपला डोळा अधिक वेळेपर्यंत फडफडत असेल तर मोठा तोटा किंवा अपघात होण्याचे संकेत आहे.
 
4 सळसळणे - आपल्या घराजवळ ढोलक वाजत असलं आणि त्यातून पानाचा सळसळण्याचा आवाज येत असल्यास हे अपशकुन असतं.
 
5 तुटणे - घरात पलंग किंवा ज्यावर झोपत असाल किंवा खुर्ची आपोआप तुटल्यास अमंगल सूचित करतं. या व्यतिरिक्त घरात काच फुटणे देखील शुभ मानले जात नाही.
 
6 उलटी चप्पल - चप्पल उलटी असल्यास घरात वाद होतात असे मानले जाते. ज्या घरात चप्पल उलटी ठेवलेली असते तेथील शांती भंग होते. 
 
7 दागिने हरवणे - सोनं हरवणे अशुभ असल्याचे तर सर्वांना माहीत आहे. परंतू केवळ सोनं तर इतर धातूंचे दागिने हरवणे देखील अशुभ असतं.
 
8 बोटं मोडणे- अनेक लोकांना बोटं मोहण्याची सवय असते. परंतू ही सवय चांगली नव्हे. असे केल्याने हातातून लक्ष्मी निघून जाते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती