लाल 'किताब मध्ये देखील झाडांचे महत्त्व सांगितले आहे

गुरूवार, 4 जून 2020 (18:06 IST)
नवीन जोशी 
आपल्याकडे देव संस्कृती मध्ये निसर्गाला शक्ती म्हणून पुजलं जातं. निसर्गाच्या नियमाचे पालन प्रत्येक कार्यामध्ये करणारा व्यक्ती आनंदी आणि निरोगी राहतो. लाल किताबामध्ये वृक्षांचे काय महत्त्व आहे आणि जातकांच्या कुंडलीनुसार कोणते झाड फायदेशीर आहे आणि कोणते नाही हे स्पष्ट केले आहेत.
 
लाल किताबामध्ये प्रत्येक ग्रह कोणत्या ना कोणत्या झाडांचे घटक आहेत. कुंडलीमध्ये जे चांगले ग्रह आहेत त्यांचा जवळ झाडे असणे शुभ मानले आहेत. बुहस्पती ग्रह हे पिंपळाचा झाडाचे घटक आहेत. कुंडलीत बृहस्पती शुभ असल्यास आणि ज्या घरात वास्तव्यास आहे घराच्या त्या भागामध्ये किंवा त्या दिशेला पिंपळाचे झाड लावल्याने शुभ फळे मिळतील. कधी कधी या झाडाला दूध घालावे. ह्याचा ओवती-भोवती घाण ठेवू नये. 
 
सूर्य तीक्ष्ण फळांच्या झाडाचा घटक आहे. ज्या जागी तो बसला आहे त्या जागेच्या आत किंवा बाहेर तीक्ष्ण फळांचे झाड लावणं शुभ फलदायी असतं. शुक्राचे घटक कापूस वनस्पती आणि मनीप्लांट आहे. जमिनीवर फिरणारी झोपलेली वेल शुक्राची घटक आहे.
 
कुंडलीत शुक्र चांगला असल्यास घरात मनी प्लांट लावणे खूप शुभ असतं. आजच्या काळात आतमधून पक्के घर असल्याने घरात शुक्र स्थापित होत नाही. कारण शुक्र कच्च्या जमिनीचे घटक आहे. घरात कच्ची जमीन नसल्यास मनी प्लांट लावणे शुभ फळाचे घटक आहेत.
 
मंगळ कडुलिंबाच्या झाडाचा घटक आहे. त्यानुसार ते आपलं शुभ परिणाम देतं. कॅक्टस आणि कोणत्याही प्रकारांचे काटेरी झाडे झुडुपे आपल्या घरात लावू नये. असे करणे शुभ नाही. पण चिंच, तीळ आणि केळ्याचे घटक आहे. केतू खराब असल्यास या झाडांना आपल्या घराच्या भोवती लावू नका. असे केल्यास घराच्या प्रमुखाच्या मुलासाठी हे अशुभ ठरतं. कारण आपल्या कुंडलीत केतू हे आपल्या अपत्यांसाठी देखील एक घटक आहे. 
 
बुधाचे घटक केळी किंवा रुंद असलेल्या झाडाची पाने आहेत. शनी हे किंकर, आंबा, आणि खजुराच्या झाडांचे घटक आहे. या झाडांना आपल्या घराच्या भोवती शुभ स्थितीमध्ये देखील लावू नये. नारळाचे झाड किंवा आजच्या काळाचे कॅक्टस राहूचे घटक आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती