ind vs pak फायनल आणि 9 चा जबरदस्त कनेक्शन, 5 खेळाडूंची जर्सी करेल कमाल

शनिवार, 17 जून 2017 (13:18 IST)
चँम्पियंस ट्रॉफीचा किताबी सामना 18 जून रोजी भारत आणि पाकिस्तानमध्ये होणार आहे. जेथे भारत आपल्या किताब कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल, तसेच पाकिस्तानची नजर किताब घेण्यात राहणार आहे. तसे बघितले तर प्रत्येक ठिकाणी टीम इंडिया मजबूत दावेदार म्हणून नजर येत आहे. मग ते मैदानावर खेळाडूंची फलंदाजी असो किंवा त्यांना भाग्याचा साथ असो. भारतीय टीमच्या खेळाडूंना आपल्या लकी चार्मवर फार विश्वास आहे. एवढंच नव्हे तर 18 जून अर्थात 1+8=9 होते असेच आता भारतीय संघाच्या खेळाडूंच्या जर्सीवर नजर टाकणे देखील जरूरी आहे, ज्या नंबरांना ते स्वत:हून वेगळे करत नाही. त्यांचे ऐकले तर याच नंबरांनी त्यांना नेहमी साथ दिला आहे. 
Live corecard भारत विरुद्ध पाकिस्तान 
रन मशीन कप्तान विराट कोहलीच्या जर्सीचा नंबर देखील 18 आहे. किताबी सामना 18 जूनला आहे. विराट आपल्या नंबरामुळे भावनात्मक रूपेण देखील जुळलेला आहे. जेव्हा विराट 18 वर्षाचा होता, त्या वेळेस त्याचे वडील, ज्यांच्या तो फार जवळ होता, त्यांनी या जगाला निरोप दिला. 18 डिसेंबर 2006 ला त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्या वेळेस विराट रणजी मॅच खेळत होता. या नंबरशी त्याला एवढे प्रेम आहे की अंडर-19 विश्व चषकात त्याने याच नंबरची जर्सी घातली आणि भारताला विश्व कप मिळवून दिला.
टीम इंडियाचा ओपनर आणि टूर्नामेंटमध्ये शानदार फॉर्ममध्ये चालत असलेल्या रोहित शर्माच्या जर्सीचा नंबर 45 आहे. अर्थात  4+5=9. तो या नंबरला स्वत:साठी लकी मानतो. तसे देखील एका ज्योतिषाने 9 नंबरला त्याला लकी नंबर आहे असे सांगितले होते. जेव्हा तो भारताच्या अंडर-19 विश्व कपमध्ये सामील झाला, तेव्हा त्याच्या आईने त्याला 45 नंबरची जर्सी दिली होती. तेव्हापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील तो याच नंबराची जर्सी घालतो.
टॉप क्लास स्पिनर भारताचा के आर अश्विनच्या जर्सीचा नंबर 99 आहे. अर्थात 9+9=18 आणि 1+8=9.  9 नंबर अश्विनचा आवडता नंबर आहे. तसे याच्या मागचे कारण हे ही आहे की शाळेत अश्विनचा रोल नंबर 9 होता. एवढंच नव्हे तर त्याला या नंबरावर एवढा विश्वास आहे की त्याच्या ट्विटर हँडलचे नाव देखील @ashwinravi99 आहे.
केदार जाधवच्या जर्सीचे नंबर आहे 81. अर्थात 8+1=9. तसेच जाधव देखील सध्या आपल्या शानदार फॉर्ममध्ये आहे आणि कोणत्याही वेळेस तो मॅचचा पासा पालटू शकतो.  

वेबदुनिया वर वाचा