Ank Jyotish 28 August 2022 दैनिक अंक ज्योतिष भविष्य 28 ऑगस्ट

रविवार, 28 ऑगस्ट 2022 (10:24 IST)
मूलांक 1 -आज तुमचा दिवस आनंददायी जाईल. विचार केलेले काम पूर्ण होतील. रखडलेली कामे होऊ शकतात. नोकरी आणि व्यवसायात तुम्हाला नशिबाची साथ लाभेल. नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. खर्च जास्त होईल.  महत्त्वाच्या बाबतीत निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला जरूर घ्या. व्यवसायात लाभाचे योग समभावतात. मित्र आणि कुटुंबीयांचे सहकार्य मिळेल.वाहन वापरताना दक्षता घ्या.
 
मूलांक 2 -आज तुमचा दिवस यशांनी भरलेला असेल. पैसा येण्याचा मार्ग सापडेल. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. नोकरी आणि व्यवसायातील वातावरण अनुकूल राहील. मन प्रसन्न राहील. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात मधुरता राहील. हवामानातील बदल आरोग्यावर परिणाम करू शकतात. वाहन वापरताना दक्षता घ्या.
 
मूलांक 3 -आज तुमचा दिवस संमिश्र फळ  देणारा राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल . नोकरी आणि व्यवसायात बदलाची स्थिती संभवते. कोणत्याही कामात घाई करू नका. व्यवसायात स्पर्धात्मक परिस्थितींपासून दूर राहा. विरोधकांपासून सावध राहा. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात मधुरता राहील. हवामानातील बदल आरोग्यावर परिणाम करू शकतात.
 
मूलांक 4 -आज तुम्ही उत्साहाने भरलेले असाल. पूर्वी नियोजित सर्व कामे पूर्ण होतील. कार्यक्षेत्र आणि व्यवसायात सोपवलेल्या जबाबदाऱ्या पार पाडाल. आधीच सुरू असलेल्या समस्यांचे निराकरण मिळेल. भाग्याची साथ लाभेल. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. प्रेमसंबंधात गोडवा येईल. खर्चाचे प्रमाण वाढतील. कुटुंबात आनंदाचे  वातावरण राहील. कुटुंबात धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. आरोग्याच्या दृष्टीने दिवस सामान्य राहील
 
मूलांक 5 -आज तुमचा दिवस सामान्य फळ देणारा असेल. नोकरी आणि व्यवसायात वातावरण अनुकूल राहील. आधीच सुरू असलेल्या समस्यांचे निराकरण मिळेल. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. व्यावसायिक प्रवास संभवतात. वादाच्या परिस्थितीपासून दूर राहा. जुने मित्र भेटण्याची शक्यता आहे.आरोग्याच्या दृष्टीने दिवस  सामान्य राहील.  
 
मूलांक 6 -आज तुमचा दिवस यशांनी भरलेला असेल. कामात आणि व्यवसायात भाग्याची साथ लाभेल. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. प्रेमसंबंधात गोडवा येईल. खर्चाचे प्रमाण वाढतील. व्यवसायानिमित्त प्रवास संभवतात. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. कुटुंबात धार्मिक कार्यक्रम होतील. आरोग्याच्या दृष्टीने दिवस सामान्य फळ देणारा राहील. पोटाच्या आजारामुळे त्रास संभवतात.
 
मूलांक 7 -आज तुमचा दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. नोकरी आणि व्यवसायात सावधगिरी बाळगा. सहकाऱ्यांशी मतभेद संभवतात. वाणी आणि रागावर नियंत्रण ठेवा. नवीन योजनांवर काम सुरू करण्यापूर्वी, अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. कुटुंबातील एखाद्याच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. मानसिक तणावा मुळे त्रास संभवतात.
 
मूलांक 8 -आज तुमचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील.  कार्यक्षेत्र आणि व्यवसायात विचारपूर्वक काम करा. नवीन योजनांवर काम सुरू करू शकता. नोकरीच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या येतील. व्यवसायात अचानक लाभाच्या संधी मिळण्याची शक्यता आहे. भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेऊ नका. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. हवामानातील बदलचा आरोग्यावर परिणाम करू शकतात. वाहन वापरताना दक्षता घ्या.
 
मूलांक 9 - आज तुमचा दिवस सामान्य फळ देणारा असेल. नोकरी आणि व्यवसायात संयम ठेवून काम करा. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा. एखाद्या गोष्टीबद्दल मनात अस्वस्थता राहील. भावनेच्या आहारी जाऊन महत्त्वाच्या बाबींवर निर्णय घेऊ नका. नुकसान संभवतात. कुटुंबातील एखाद्याच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. मानसिक तणावा मुळे त्रास संभवतात. वाहन वापरताना काळजी घ्या.
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती