मेष- शनीसाठी तेलात सावली बघून दान करावे. केतूसाठी काळ्या कुत्र्याला तेला लावलेली पोळी खाऊ घालावी. गणेश आराधना करावी. अमावस्येला पितरांनिमित्त भोजन करवावे.
वृषभ- हनुमान मंदिरात बसून नित्य हनुमान चालीसा पाठ करावा. सूर्याला अर्घ्य द्यावे. वृद्धांची सेवा करून त्यांच्या आशीर्वाद मिळवावा. महादेवाच्या मंदिरात दूध-मिश्रित जल अर्पित करावे.
मिथुन- महादेवाला अभिषेक करावा. 'ॐ नम: शिवाय' मंत्राचा नित्य जप करावा. पक्ष्यांना दाणे घालावे. गरिबांना भोजन करवावे. शनिवारी हनुमान मंदिरात दिवा लावून नैवेद्य दाखवावा.
कर्क- संत, वृद्ध आणि गुरुंची सेवा करावी. कुत्रे आणि कावळ्यांना भोजन द्यावे. पितरांनिमित्त दान करावे. हनुमानाच्या मंत्र-स्तोत्राचा यथाशक्ती जप करावा. आई-वडिलांचा अपमान करू नये.
सिंह- देवी लक्ष्मी-दुर्गांचे पूजन-अर्चन करावे. कुमारी पूजन-भोजन करवावे. कुत्र्यांना पोळी खाऊ घालावी. सूर्याला अर्घ्य द्यावे. हनुमानाची सेवा करावी.
कन्या- आपल्या कुलदैवताची किंवा इष्ट देवताची आराधना करावी. क्लेश कमी होतील. गायीला पोळी खाऊ घालावी. दुर्गार्चन शुभ राहील. कोणाचाही अपमान करू नये. कोळसे पाण्यात वाहू घालावे.
तूळ- हनुमान बाहुक, हनुमान चालीसा, बजरंग बाण यापैकी एक ते 11 पाठ रोज करावा. माकडांना चणे-गूळ खाऊ घालावे. गाय-कुत्र्याला पोळी खाऊ घालावी. आई-वडिलांना नमस्कार करून घरातून निघावे. कोणाचाही अपमान करू नये.
मीन- पिंपळ, वड, आवळा इतर वृक्ष लावून सेवा करावी. नित्य पिंपळ आणि वडाच्या झाडाखाली दिवा लावून प्रदक्षिणा घालावी.
विशेष : सर्व राशीच्या जातकांनी मुलं, वृद्ध, स्त्री, वनस्पती, नदी, पाणी यांचे सन्मान करावे. अधिक भाषण क्लेशकारक ठरू शकतं. व्यसनांपासून दुरी प्रगतीचा मार्ग दाखवेल. इष्ट आराधना केल्याने संकटापासून बचाव होईल.