भाग्योदय दर्शवणारे स्वप्न: स्वप्नात स्वत:ला जळताना, एखाद्याचा खून करताना, पर्वत चढताना, धार्मिक कार्य किंवा देवी- देवतांची मूर्ती पाहणे, कडू पदार्थ खाणे, स्वत:ला रडताना बघणे, असे काही दिसणे आपल्या व्यवसायात किंवा नोकरीत आपली उन्नती होण्याचे संकेत आहे.
धन प्राप्ती दर्शवणारे स्वप्न: स्वप्नात नभात उडणे, नदीत किंवा समुद्रात पोहणे, उंच जागी बसणे उन्नतीचे प्रतीक आहे. स्वप्नात स्वत:ला मला मध्ये पडलेले किंवा शरीरावर सर्प दिसणे, किंवा सर्पदंश होणे असे दिसण्याचा अर्थ आहे की आपल्या धन प्राप्ती होणार आहे. स्वप्नात तुटलेले छप्पर दिसल्यास धनप्राप्तीचे योग असतात. स्वप्नात सर्प खजिन्याची राखवली करताना दिसत असेल तर धनलाभ मिळेल.