येत्या सप्ताहात पाच ग्रह पाहण्याची संधी!

वेबदुनिया

सोमवार, 5 एप्रिल 2010 (19:15 IST)
ND
ND
आकाश निरिक्षकांसाठी येता आठवडा म्हणजे चांगलीच पर्वणी आहे. कारण या आठवड्यात तब्बल पाच ग्रह त्यांना सहजगत्या बघता येणार आहेत. शुक्र, बुध, मंगळ आणि शनी हे ग्रह रात्री बघता येतील, तर गुरू हा सर्वांत मोठा ग्रह सकाळी पहाता येईल.

बुध हा नेहमी सूर्याच्या तेजाने झाकोळून गेलेला असतो. तो दहा एप्रिलपर्यंत रात्री पहाता येईल. उर्वरित चार ग्रह आगामी काही महिन्यांपर्यंत आकाशात सहजगत्या बघता येतील, अशी माहिती प्लॅनेटरी सोसायटी ऑफ इंडियाचे सचिव एन. श्री. रघुनंदनकुमार यांनी दिली.

एकाच दिवशी सगळे पाच ग्रह दिसू शकतील असे मात्र नाही. दोन ते तीन ग्रह एका रात्री दिसू शकतील. अगदी सकाळपर्यंतही ते पहाता येतील. पण पाचही ग्रह एकाच रात्री दिसण्याची शक्यता अगदीच दुर्मिळ असल्याचे श्री. कुमार यांनी सांगितले.

हे ग्रह ओळखण्याची सर्वांत सोपी युक्ती म्हणजे हे ग्रह तार्‍यांसारखे चमकत नाहीत. स्निग्ध प्रकाश पाझरत असलेली अवकाशवस्तू दिसली की ती ग्रह असेल हे समजायला हरकत नाही. फक्त कोणता ग्रह पहाता ते मात्र नीट अभ्यास करून पहा, असा सल्लाही कुमार यांनी दिला आहे.

वेबदुनिया वर वाचा