चाक्षुषोपनिषदकृष्ण यजुर्वेद शाखेची उपनिषद आहे. या उपनिषदात डोळे निरोगी राहण्यासाठी सूर्य प्रार्थनेचा मंत्र दिला गेला आहे. या मंत्राचे नियमित पठण केल्यास नेत्र रोगांपासून संरक्षण मिळते. ज्या लोकांची दृष्टी लहान वयात कमकुवत झाली आहे त्यांनी या मंत्राचा जाप आवर्जून करावा.ह्याचा जाप केल्याने फायदा होतो.
चाक्षुषोपनिषद्ची त्वरित फळ देण्याची पद्धत खालीलप्रमाणे आहे.
कुठल्याही प्रकाराच्या डोळ्याच्या आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तीने या पद्धतीचा फायदा घ्यावा.ज्यांना डोळ्यांशी संबंधित आजार आहे त्यांचा साठी रविवार अत्यंत शुभ आहे (जर हा शुक्ल पक्षाचा किंवा रविपुष्य योगाचा रविवार असेल पण शक्य नसल्यास कुठलाही रविवार घेता येऊ शकतो.) सकाळी एका तांब्याच्या ताटलीत खालील दिलेले यंत्र प्रतिष्ठापित करावयाचे या यंत्र खालील 4 शब्द लिहावयाचे आहे..हे हळदी ने लिहावयाचे आहे. यंत्र असे आहेः
81527
631211
14981
451013
मम चक्षुरोगान् शमय शमय
या यंत्रावर तांब्याच्या वाटीत चतुर्मुखी साजूक तुपाचा दिवा लावावा. गंध, अक्षता, फुले वाहून यंत्राची पूजा करावी. पूर्वीकडे तोंड करून बसावे. हळदीच्या माळीने “ॐ ह्रीं हंस:'' या बीजमंत्राच्या 6 माळ जपाव्या. तत्पश्चात चाक्षुषोपनिषदचे 12 वेळा पठण करावे आणि बीज मंत्राच्या 5 माळी जपाव्या.
हे पठण करण्यापूर्वी एका तांब्याच्या भांड्यात तांबडे फुल, तांबडे चंदन आणि पाणी ठेवावे. जप पूर्ण झाल्यावर या पाण्याने सूर्याला अर्घ्य द्यावे आणि प्रार्थना करावी की माझे ह्या नेत्ररोगास त्वरित आराम मिळू द्या. दर रविवारी असे करावे आणि दिवसभरात एकदाच आळणी जेवण करावे.