अमावस्याच्या दिवशी ठेवा खास खबरदारी

बुधवार, 18 फेब्रुवारी 2015 (14:48 IST)
ज्योतिष शास्त्रात चंद्राला देव मानण्यात आले आहे. आमावस्याच्या दिवशी चंद्रमा आपल्याला दिसत नाही. अशा परिस्थिती जे लोकं अतिभावुक असतात त्यांच्यावर या गोष्टी सर्वात जास्त लागू पडतात. मुली मनाने फारच भावुक असतात. या दिवशी चंद्रमा न दिसल्याने आमच्या शरीराची हालचाल अधिक वाढून जाते. जे व्यक्ती नकारात्मक विचार ठेवणारे असतात त्यांना नकारात्मक शक्ती आपल्या प्रभावात घेऊन घेते.  
 
शास्त्रानुसार ज्या दिवशी चंद्र दिसत नाही अर्थात ज्याचे क्षय आणि उदय होत नाही त्याला अमावस्या म्हणतात. या दिवसाला 'कुहु अमावस्या' देखील म्हणतात. अमावस्या महिन्यातून एकदा येते. अमावस्या सूर्य आणि चंद्राच्या मिलनाचा काळ असतो. या दिवशी दोन्ही एकाच राशीत असतात.  
 
आमा‍वस्याच्या दिवशी भूत-प्रेत, पितृ, पिशाच्च, निशाचर जीव-जंतू आणि दैत्य जास्त सक्रिय आणि उन्मुक्त असतात. तेव्हा या दिवशी अतिभावुक लोकांना फारच सावधगिरी बाळगावी लागते. आत्मेच्या शरीराच्या रचनेत 25 टक्के फिजिकल ऍटम आणि 75 प्रतिशत ईथरिक ऍटम असतो.   
 
त्याच प्रकारे पितृ शरीराच्या निर्माणामध्ये 25 टक्के ईथरिक ऍटम आणि 75 टक्के एस्ट्रल ऍटम असतो. जर ईथरिक ऍटम सघन झाले तर प्रेतात्मांचे छायाचित्र घेऊ शकता आणि जर एस्ट्रल ऍटम सघन झाले तर पितरांचे देखील छायाचित्र तुम्ही घेऊ शकता.  
 
प्रमुख अमावस्या : भौमवती अमावस्या, मौनी अमावस्या, शनी अमावस्या, हरियाली अमावस्या, दिवाळी अमावस्या, सोमवती अमावस्या, सर्वपितृ अमावस्या.  
 
आमावस्याच्या दिवशी काय नाही करावे ... 
 
* या दिवशी कुठल्याही प्रकारच्या तामसिक वस्तूंचे सेवन करणे टाळावे.   
 
* या दिवशी दारू इत्यादी नशापासून दूर राहिले पाहिजे. याने शरीरावरच नव्हे तर तुमच्या भविष्यावर देखील दुष्परिणाम पडू शकतात.  
 
* जाणकार लोकं तर असे ही म्हणतात की चुतुर्दशी, अमावस्या आणि प्रतिपदा ह्या दिवसात पवित्र राहण्यातच तुमचे कल्याण आहे. 

वेबदुनिया वर वाचा