उन्हाळ्यात कुत्रे जीभ का बाहेर काढतात ?जाणून घ्या

रविवार, 4 जुलै 2021 (17:57 IST)
आपण बर्‍याचदा पाहिलेच असेल की उन्हाळ्याच्या काळात कुत्रे आपली जीभ बाहेर ठेवतात असं का करतात जाणून घ्या.

जेव्हा बाहेरील तापमान जास्त असते तर आपल्या शरीरात असलेल्या घामाच्या ग्रंथी घाम उत्पन्न करतात आणि शरीरातील घाम वाळतो तेव्हा थंडावा अनुभवतो.कुत्रे हे उष्ण रक्ताचे प्राणी आहेत.त्यांना इतर प्राण्यांपेक्षा कमी घाम येतो.आणि तसेच बाहेरचे तापमान देखील जास्त असतो.

कुत्र्यांना उष्णता सहन होत नाही.तर कुत्रे हे जीभ बाहेर काढून बाष्पीभवनची क्रिया करतात या मुळे कुत्र्यांना थंडावा मिळतो.हेच कारण आहे की उन्हाळ्यात कुत्रे जीभ बाहेर काढतात.
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती