संबधित अवयवांवर दाब व ताण येतो ज्याने त्या अवयवांमधील रक्ताभिसरण सुधारतं.
शुध्द रक्ताचा पुरवठा होतो ज्याने अवयवांचे कार्य वृध्दिंगत होते. अशाने संबधित विकार बरे होण्यास मदत मिळते.
सूर्य नमस्कार घातल्याने लहान मुलांचे आरोग्य सुधारुन प्रतिकार शक्ती वाढते.
शारीरिक, मानसिक व भावनिक संतुलन राखणाऱ्या ग्रंथीचे कार्य सुधारते.
शारीरिक, मानसिक कार्यक्षमता वाढते.
स्थिरता निर्माण होऊन मुलांमधील चंचलता कमी होण्यास मदत होते.