Protocol Of President: जर राष्ट्रपती राज्याच्या दौऱ्यावर गेले असताना त्यांचा प्रोटोकॉल काय आहे, माहिती जाणून घ्या

बुधवार, 15 सप्टेंबर 2021 (15:20 IST)
देशाचे राष्ट्रपती हे देशाचे पहिले नागरिक असतात.भारताच्या राष्ट्रपतींच्या सुरक्षिततेसाठी आणि सन्मानासाठी एक विशेष प्रोटोकॉल बनवण्यात आला आहे, ज्याचे पालन त्यांच्या प्रत्येक प्रवासा दरम्यान करावे लागते.
 
Travel Protocol of President Of India: देशातील सर्वात मोठे  पद म्हणजे राष्ट्रपतीचे(President Of India) आहे .देशाचे राष्ट्रपती हे देशाचे पहिले नागरिक असतात. भारताच्या राष्ट्रपतींच्या सुरक्षिततेसाठी आणि सन्मानासाठी एक विशेष प्रोटोकॉल बनवण्यात आला आहे, ज्याचा प्रत्येक दौऱ्या दरम्यान पालन करणे आवश्यक आहे. त्यांच्या हालचालीपूर्वी काही विशेष तयारी केली जाते. प्रवासादरम्यान, ते एका विशेष कारमधून ये - जा करतात.राष्ट्रपतींच्या प्रवासाच्या प्रोटोकॉलबद्दल जाणून घेऊया-
 
* राष्ट्रपतींच्या प्रवासाचे प्रकार -
1  सार्वजनिक प्रवास - जेव्हा राष्ट्रपती पदभार स्वीकारतात तेव्हा त्यांचा पहिला  प्रवास हा सार्वजनिक प्रवास मानला जातो.
2 अधिकृत प्रवास - तसे, जर देशाचे राष्ट्रपती कोणत्याही प्रवासावर गेले तर त्याला अधिकृत प्रवासच मानतात . 
 
 
* राष्ट्रपतींचा कार्यक्रम पूर्वी पासून निश्चित केला जातो-
राष्ट्रपतीं एखाद्या देशाच्या दौऱ्यावर असतात तेव्हा त्यांचा हा कार्यक्रम आधीपासूनच  नियोजित केलेला असतो. राष्ट्रपतींच्या प्रोटोकॉलनुसार, जेव्हा ते कोणत्याही शहर किंवा गावाला भेट देतात तेव्हा त्यांच्या कार्यक्रमात कोणताही बदल केला जाऊ शकत नाही.याशिवाय त्यांना भेटणाऱ्या लोकांची संख्याही निश्चित असते.राष्ट्रपतींच्या कोणत्याही कार्यक्रमाला कोण उपस्थित राहणार हे आगाऊ ठरवले जाते. ही यादी राष्ट्रपती भवनातून मंजुरी मिळाल्यानंतरच तयार करून पुढे पाठवली जाते.
 
* यांना राष्ट्रपतींच्या कार्यक्रमात सहभागी होण्याचा अधिकार आहे-
 फक्त विशिष्ट व्यक्ती आणि अधिकारी सहभागी देशाच्या राष्ट्रपतींच्या कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात. यामध्ये केवळ राज्याचे मुख्यमंत्री, मुख्य सचिव, महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षक, सरकारचे सचिव (राजकीय), पोलीस आयुक्त, जिल्हा दंडाधिकारी, संरक्षण सेवांचे वरिष्ठ अधिकारी राष्ट्रपतींच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकतात. राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांद्वारे  विमानतळावर राष्ट्रपतींचे स्वागत केले जाते.
 
* राष्ट्रपतींच्या कारचे वैशिष्ट्ये -
 आपल्याला सांगत आहोत, की राष्ट्रपती ज्या कारने जातात ती खूप खास असते. ही मर्सिडीज एस-क्लास (S-600) पुलमैन गार्ड कार आहे. या कारची किंमत सुमारे 10 ते 12 कोटी असते. या गाडीवर नंबर प्लेटही नसते. ही कार बुलेट प्रूफ असून बॅलिस्टिक प्रोटेक्शन फीचरसह असते. या कारमध्ये इमरजेंसी फ्रेश एयर सिस्टम आहे जी आपत्कालीन परिस्थितीत ऑक्सिजन पुरवण्यास मदत करते. यासह,त्यात नाइट व्यू असिस्ट असते, जेणेकरून रात्रीच्या अंधारातही ही कार सहजपणे चालवता येईल. राष्ट्रपतींच्या प्रवासाचा संपूर्ण खर्च सरकारी खजिन्यातून केला जातो.  
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती