First AC Train Of India: क्वचितच असा कोणी असेल जो ट्रेनमध्ये बसला नसेल. भारतातील रेल्वे हा लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. आपल्या पैकी बरेच जण ट्रेनच्या एसी बोगीत बसलेले असावेत.पण,एसी बोगी ट्रेन कशी सुरू झाली हे आपल्याला माहिती आहे का? आजपासून सुमारे 93 वर्षांपूर्वी ट्रेनमध्ये एसी सुविधा सुरू करण्यात आली होती.आजही देशात अशा अनेक गाड्या धावत आहेत आणि लोकांना त्यांच्या गंतव्यस्थानाकडे घेऊन जात आहेत.
बर्फाच्या लाद्या वापरल्या जात होत्या -
आता आपल्याला प्रश्न पडला असेल की या ट्रेनला थंड कसे ठेवत असतील? त्या वेळी ट्रेन थंड ठेवण्यासाठी बर्फाच्या लाद्या ठेवत असे.ट्रेनची एसी बोगी थंड करण्यासाठी बोगीच्या खाली एक बॉक्स ठेऊन त्यामध्ये बर्फ ठेऊन पंखा लावायचे.या पंख्याच्या साहाय्याने ती ट्रेन थंड करायची. वर्ष 1934 मध्ये प्रथमच गाड्यांमध्ये एसी बसवण्याचे काम सुरू झाले. फ्रंटियर मेल ट्रेनमध्येच प्रथम एसी बसवण्यात आले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि नेताजी यांनी या ट्रेनमध्ये प्रवास केला होता,
ही फ्रंटियर मेल मुंबई ते अफगाण सीमा पेशावर पर्यंत धावत असायची. ही ट्रेन स्वातंत्र्य संग्रामाची साक्षीदारही राहिली आहे. ब्रिटिश अधिकाऱ्यांव्यतिरिक्त स्वातंत्र्य सैनिकही या मधून प्रवास करत असत. नेताजी सुभाषचंद्र बोस आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी या ट्रेनमध्ये प्रवास केला. बोगी थंड ठेवण्यासाठी बर्फाचा वापर केला जात होता. जेव्हा ही बर्फ वितळण्याची तेव्हा ह्याला वेगवेगळ्या स्थानकांवरील बॉक्समधील पाणी काढून बर्फाने भरली जायची.