बाकावर उभे राहा - आपली पातळी उंचवा. मोठे स्वप्न बघा.
हात वर करुन उभे राहा - उच्च ध्येय ठेवा, उंची गाठा.
भिंतीकडे तोंड करून उभे राहा - आत्मपरीक्षण करा.
वर्गाबाहेर उभे राहा - चार भिंतीतून बाहेर या, जग बघा.
गुडघे टेका - विनम्र व्हा.
कोंबडा व्हा - शारीरिक सहनशक्ती वाढवा.
फळा पुसा - झाले गेले विसरा आणि नव्याने सुरुवात करा.
तोंडावर बोट ठेवा - स्वत:च्या बाता कमी करा.
कान धरा - लक्षपूर्वक ऐका.
वाका, अंगठे धरून उभे राहा - लवचिक बना.
हा धडा दहा वेळा लिहा - अचूकतेसाठी सराव करा.
शाळा सुटल्यावर थांबा - जीवघेण्या स्पर्धेत उतरू नका, विशेष व्यक्ती बना.