जीवनात यश मिळवण्यासाठी चाणक्य यांच्या या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा

मंगळवार, 11 ऑक्टोबर 2022 (16:05 IST)
आचार्य चाणक्य हे महान विद्वान होते. त्यांना विविध विषयांचे सखोल ज्ञान होते. चाणक्य एक कुशल राजकारणी, रणनीतीकार आणि अर्थशास्त्रातील तज्ञ होते. मानवजातीच्या हितासाठी त्यांनी अनेक शास्त्रे लिहिली आहे. त्यांची बुद्धिमत्ता आणि ज्ञान यामुळे त्यांना कौटिल्य असे देखील संबोधण्यात आले. चाणक्या यांनी लिहिलेल्या नीतिशास्त्रात मानवी जीवनाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या गोष्टी नमूद केल्या गेल्या आहेत. त्यांची धोरणे मानवी जीवनाच्या विविध पैलूंना स्पर्श करतात. अशात आचार्य चाणक्यांनीही जीवनात यशस्वी होण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत-
 
योग्य रणनीती बनवा- जीवनात यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम हे अत्यंत आवश्यक आहे. आपले ध्येय नजरेसमोर ठेवून योग्य रणनीती तयार करणे महत्त्वाचे आहे. योग्य रणनीती बनवून तयारी केल्यास ध्येय गाठण्यात अडथळे येत नाही.
 
पूर्ण उर्जेने काम पूर्ण करा- कधी कधी आपण मोठ्या उत्साहाने कामाला सुरुवात करतो पण काही काळानंतर त्याच कामाचा कंटाळा येतो. याने आपल्या कामावर नकारात्मक परिणाम होतो. आचार्य चाणक्य म्हणतात की जर आपल्याला कामात यश मिळवायचे असेल तर ज्या उर्जेने आपण काम सुरू केले त्याच उर्जेने काम पूर्ण केले पाहिजे.
 
इतरांच्या चुकांपासून शिका- आचार्य चाणक्य म्हणतात की इतरांच्या चुकांपासून शिकून पुढे जावे. जर आपण इतरांच्या चुका बघून काही शिकलो तर स्वतःहून चुका होण्याची शक्यता फारच कमी असते. अशात ध्येय गाठण्यात कोणताही अडथळा येत नाही. जो स्वतः चुकतो आणि त्यात सुधार करुन पुढे वाढतो त्याचा खूप काही काळ यातच निघून जातो.
 
कठीण परिस्थितीत विचलित होऊ नका- आपण कोणतेही काम करतो तेव्हा त्यात अडचण येणं स्वाभाविक आहे. अशात अनेक वेळा घाबरायला होतं. आचार्य चाणक्य म्हणतात की कामाच्या मध्यभागी अडथळे किंवा कठीण परिस्थितीमुळे विचलित होऊन जाऊ नका. माणसाने नेहमी संयम राखून समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जी व्यक्ती अत्यंत कठीण प्रसंगातही घाबरत नाही ती आपल्या आयुष्यात नक्कीच यशस्वी होते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती