माणसाच्या आकाराचे होते पेग्विन्स

न्यूझीलंडमध्ये पाच ते सहा कोटी वर्षांपूर्वी मानवाच्या आकराचे ‍धिप्पाड पेंग्विन पक्षी अस्तित्वात होते. ते दोन्ही पायावर उभे राहिले की त्यांची उंची 1.65 मीटर होती व त्यांचे वजन सुमारे शंभर किलो होते, असे जर्मनी आणि न्यूझीलंडच्या संशोधनकांनी म्हटले आहे. 
 
2004 मध्ये अशाच एका पेंग्विनचे जीवाश्म न्यूझीलंडच्या साऊथ आयलंडवरील हॅम्पडेन बीचवर आढळले होते. त्याच्या अनेक वर्षांच्या अभ्यासानंतर आता हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. हे पेंग्विन इतिहासातील सर्वात मोठ्या आकाराच्या पेंग्विनपैकी एक होते.
 
सध्या एम्परर पेंग्विन ही पेंग्विनची प्रजाती सर्वात मोठ्या आकाराची म्हणून ओळखली जाते. त्यांची उंची 1.22 मीटर आणि वजन 23 किलो असते. कोट्यवधी वर्षांपूर्वीच्या पेंग्विनचे खरे रूपडे कसे होते हे आताच सांगणे कठीण असल्याचे अॅलन टेनिसन या संशोधकाने म्हटले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती