किशोरवयीन मुलांमध्ये गेमिंगचे वेड

किशोरवयीन मुलांमध्ये गेमिंगचे वेड लागत आहे. याला लगाम घालण्यासाठी चीनची दिग्गज गेमिंग कंपनी टेन्सेंटने मोठे पाऊल उचलले. यामुळे देशभरात मुले लोकप्रिय गेम ऑनर ऑ‍फ किंग्ज एकच तास खेळू शकतील. 12 वर्षे वयाच्या मुलांसाठी हे बंधन घातले आहे. 12 पेक्षा अधिक वयाच्या मुलांना 2 तास गेम खेळण्याची मुभा दिली आहे. 
गेम विकासकांचे म्हणणे आहे की सरकारने मोबाइल गेम व्यसनविरूद्ध कोणतेही पाऊल उचलले नाही. त्यामुळे यासाठी कंपनीने पुढाकार घेतला आहे. रात्री 9 वाजेनंतर गेम खेळण्यासाठी लॉगरून करता येणार नाही. ऑनर ऑ‍फ किंग आणि ऑनर ऑफ ग्लोरी मोबाइल गेम प्रचंड लोकप्रिय आहे. मुले यावर पैसा आणि वेळ अनाठायी खर्च करत असल्याची पालकांची तक्रार आहे.

वेबदुनिया वर वाचा