चमचमणारा कोळी

thwaitesia spider
जगाच्या पाठीवर विभिन्न प्रकाराचे लाखो जीवजंतू आढळून येतात. त्यांच्यातील काही जीव रंगरुपाच्या बाबतीत आपल्या प्रजातीतील अन्य जिवांपेक्षा एकदम वेगळे असतात. हा कोळीही अशाच जिवांपैकी आहे. या कोळ्याकडे पहिल्यावर जणू तो पूर्णत: काचेपासून बनला आहे किंवा एखाद्या नाजूक दागिन्याचा तुकडात आहे, असे वाटते.. मात्र तसे अजिबात नाही.
 
हा अद्भूत जीव थ्वाइटेसिया जीनस प्रजातीचा कोळी आहे. या प्रजातीमध्ये वेगवेगळ्या प्रकाराचे कोळी आढळून येतात. त्यात या कोळ्याचाही समावेश होतो. या कोळ्याच्या पोटावर चमकदार धातू असल्यासारखे वाटत असले तरी तो धातू नसून त्याची त्वचा आहे. या अनोख्या कोळ्याबाबत फार जास्त माहिती शास्त्रज्ञांकडे उपलब्ध नाही. ऑस्ट्रेलिया आणि सिंगापूरच्या जंगलामध्ये हा कोळी खासकरुन आढळून येतो, असे सांगितले जाते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती