डाव्या हातावर का बांधतात घडी?

आपण कधी यावर विचार केला आहे का की अधिकतर लोकं डाव्या हातात घडी का बांधतात? याचे उत्तर खूपच रोचक आहे.
 
डाव्या हातात घडी बांधण्यापूर्वी आपल्याला त्या काळात चलावे लागेल जेव्हा घड्याळ हातात नाही तर डाव्या पॉकेटमध्ये असायची. आपण ही जुन्या काळातील चेन असलेल्या घड्याळी पाहिल्या असतील ज्या खिशात ठेवल्या जात होत्या. तेव्हा खिशातून घड्याळ काढून वेळ बघितला जात असे.
नंतर काही लोकांनी ही चेन असलेली घड्याळ हातात बांधायला सुरुवात केली आणि तेव्हापासून हातात घड्याळ बांधण्याची फॅशन आली. 
 
डाव्या बाजूला घड्याळ बांधण्याचे एक आणखी मुख्य कारण म्हणजे अधिकतर लोकं उजव्या हाताने काम करतात. म्हणून जेव्हा उजवा हात कामात व्यस्त असतो तेव्हा डाव्या हातातील घडी बघणे सोपे असतं. डावा हात अधिक व्यस्त असल्यामुळे घडीवर स्क्रेच लागणे, काच फुटणे, आदळण्याची शक्यतापण अधिक असते. म्हणून डाव्या हातावर घडी बांधणे अधिक सुरक्षित असतं. परंतू डावखोर असणार्‍यांसाठी हे नियम लागू होत नाही.

वेबदुनिया वर वाचा