फुलांना मधुर सुगंध का असतो?

गुरूवार, 9 एप्रिल 2015 (14:54 IST)
फुलांना असणारा मधुर सुगंध हा मुख्यत: कीटकांना आकृष्ट करण्यासाठी असतो. हे कीटक पराग आणि सुगंधी मध यांचा अन्न म्हणून उपयोग करतात. फुलांच्या पाकळय़ांच्या मुळापाशी हा सुगंधी मध म्हणजेच साखरेसारखा द्रव तयार होतो. कीटकांकडून नवनिर्माणासाठी मदत मिळते. भुंगे किंवा अन्य कीटक सुगंधामुळे आकृष्ट होऊन त्या फुलावर येतात. त्यावेळी फुलातील पराग त्यांच्या अंगाला चिकटतात आणि त्या फुलाकडून येतात. फुलांकडून होणार्‍या नव्या निर्मितीला कारणीभूत ठरणार्‍या कीटकांना फुलांकडे आकृष्ट होण्यासाठी त्या फुलांचा मधुर सुगंध हेच प्रमुख कारण असते.
 

वेबदुनिया वर वाचा