कोण आहे हा सूर्य?

आपण सर्वांनी अलीकडेच उन्हाचा प्रकोप अनुभवला. उन्हाळ्याचा कंटाळा आला तरी प्रकाशाची गरज तर आपल्याला असतेच. सूर्यावर राग येत असला तरी त्याच्यापासून प्रकृतीला ऊर्जा मिळते. झाडं तर सूर्यप्रकाशामुळे अन्न तयार करू शकतात. चला जाणून घ्या सूर्याबद्दल आणखी काही गोष्टी:
 
सूर्य एक तारा असून याची निर्मिती 4.6 अब्ज वर्षांपूर्वी झाल्याची शक्यता आहे. या आगीच्या गोळ्यात 90 टक्के हायड्रोजन तर 7 टक्के हेलियम असतो. याव्यतिरिक्त ऑक्सिजन, कार्बन, आर्यन, आणि निऑन यांचंही थोडं प्रमाण असतं.
 
सूर्य आकाराने एवढा मोठा आहे की यात पृथ्वीच्या आकाराचे एक दशलक्ष ग्रह सहज मावू शकतील.
 
सूर्य पृथ्वीपासून 92 दशलक्ष मैल दूर आहे. तेथून पृथ्वीपर्यंत प्रकाश पोहोचायला साधारपणे आठ मिनिटे लागतात.
 
सूर्य आणि पृथ्वी यांच्यात चंद्र आला की सूर्यग्रहण होतं.

वेबदुनिया वर वाचा