ज्येष्ठ नाटककार प्र. ल. मयेकर (वय ६९) यांचे मंगळवारी निधन झाले. प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीवर विविध प्रकारच्या नाटकांतून ठसा उमटविणारे नाटककार म्हणून त्यांची ख्याती होती.
त्यांचा नाट्यलेखनाचा प्रवास ते बी.ई.एस.टी.मध्ये नोकरी करत असल्यापासून सुरू झाला होता. सामाजिक, कौटुंबिक, रहस्यप्रधान, विनोदी असे वेगवेगळे बाज असणारी नाटके त्यांनी लिहिली. त्यांनी एकांकिका लेखन केले, तसेच हौशी रंगभूमीवर मोठे योगदान दिले.