कुटुंबाची साथ मोलाची - मृणाल कुलकर्णी

PR
माझा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन निखळ आहे. त्याबाबत कोणतीही तक्रार नाही. लेक, पत्नी, सून आणि आई म्हणून यश मिळाल्याने आतापर्यंतचा प्रवास अगदी सुखद आहे. माझा सुखाचा प्रवास घरापासून सुरू होतो आणि घरापाशीच संपतो. माझ्या करिअरची सुरुवात झाली तीच मुळी लग्नानंतर. बारावीत असताना ‘स्वामी’ केलं. पण त्यावेळी याच क्षेत्रात करिअर करावं असं डोक्यातही नव्हतं. केवळ संधी मिळाली म्हणून काम केलं होतं. पण लग्न झाल्यानंतर खर्‍या अर्थानं या क्षेत्राकडे करिअर म्हणून पाहायला लागले. विराजस पोटात असताना मी ‘श्रीकांत’ नावाची मालिका करत होते. या मालिकेत माझी बंगाली स्त्रीची भूमिका होती. त्यांच्या साडी नेसण्याच्या पद्धतीमुळे सात महिन्यांची गरोदर असेपर्यंत मी काम करू शकले. बाळंतपणाच्या निमित्ताने थोडी विश्रंती घेतली आणि घरच्यांच्या पाठिंब्याच्या आधारे पुन्हा जोमाने कामाला लागले.

PR
विराजसला सांभाळताना सासूबाई आणि पतीची उत्तम साथ होती. त्यामुळेच तो अगदी लहान असतानाच मी संजय खानची ‘ग्रेट मराठा’ ही भव्य-दिव्य मालिका केली. तेव्हा होकार देतानाही मनात बर्‍याच शंका होत्या. कारण तेव्हा विराजस अगदीच लहान होता. त्याला घरी ठेवणं शक्य नव्हतं. तेव्हा संजय खानने ‘तुला हव्या तेवढय़ा मदतनीस घे, जाण्या-येण्यासाठी विमानाचं तिकीट घे’ अशी सर्वतोपरी सहकार्याची भूमिका घेतली आणि काम करण्याची गळच घातली. गरज पडली तर सासूबाईंनी आणि आईने विराजसला सांभाळण्यासाठी चित्रिकरणाच्या ठिकाणी येण्याचं कबूल केलं. त्यामुळे मी निश्चिंतपणे काम करू शकले. विराजस मोठा होईपर्यंत विराजसला मी शूटिंगसाठी घेऊन जात असल्याने तो या क्षेत्राशी जवळून परिचित झाला. त्याच्यावर झालेले हे संस्कारही महत्त्वाचे आहेत.

PR
या प्रवासात मी बरेच चित्रपट केले, काही मालिकाही केल्या. ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं’ च्या निमित्तानं माझा वेगळ्या वाटेवरचा प्रवास सुरू झाला. हा प्रवासही मी मस्त एन्जॉय केला. माझ्यातल्या अस्वस्थ माणसाचे विचार यातून व्यक्त झाले. अजूनही बरेच क
मला कधीच लग्न झालं आहे, मला मूल आहे हे लपवण्याची आवश्यकता वाटली नाही. मी नॉनस्टॉप काम करू शकले याचं श्रेय सासूबाई आणि पतीला जातं. त्यांनी मनापासून घर सांभाळलं हा एक भाग झाला. पण टाळी एका हातानं वाजत नाही. आपणही त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा. दर तासाने मुलाला खायला घातलं का, फिरायला नेलं का, कपडे बदलले का असं विचारत राहिलं तर संबंध बिघडायला कितीसा वेळ लागणार? तेव्हा समोरच्यावर विश्वास टाकणं आणि त्याच्या मतांची कदर करणं हे महत्त्वाचं आहे. पतीनेही या प्रवासात मोलाची साथ दिली. तेव्हा मी मुंबईला आणि तो पुण्याला अशी परिस्थिती होती. मला यायला जमलं नाही तर तो मुलाला घेऊन मुंबईला यायचा आणि माझी बेचैनी दूर करायचा.

वेबदुनिया वर वाचा