लोकप्रिय अभिनेते अजय वढावकर यांनी 'नुक्कड' या लोकप्रिय मालिकेत गणपत हवालदाराची भूमिका साकारली होती, यांचे शुक्रवारी पुण्यात निधन झाले. काही वर्षांपूर्वी मधुमेहाच्या त्रासामुळे त्यांना आपला पाय गमवावा लागला होता आणि बरीच वर्ष ते कर्करोगानंही आजारी होते. अलीकडच्या काळात 'पवित्र रिश्ता'या मालिकेतून त्यांचे दर्शन घडले होते.