या प्लांटसाठी अधिक जागेची गरज नाही. घरात सावलीत देखील क्रासुला ची देखभाल करता येऊ शकते. फेंगशुई प्रमाणे हे रोप घरात ठेवल्याने पैशाला आकर्षित करतं. क्रासुला एक पसरणारे झाडं आहे. याचे पाने रुंद असतात आणि स्पर्श केल्यावर मखमली वाटतात. या झाडाच्या पानांचा रंग न पूर्णपणे हिरवा आणि न पिवळा असा आहे. मिश्रित रंगाचे पान इतर पानांसारखे कमजोर नसतात.
मनी प्लांटप्रमाणेच क्रासुला घरात सावलीत देखील वाढू शकतं. याला अधिक जागेची गरज नाही. आपण हे रोप लहानश्या कुंड्यात लावू शकता. फेंगशुईप्रमाणे क्रासुला सकारात्मक ऊर्जेसह धन देखील आकर्षित करतं. हे रोप घराच्या प्रवेश दारावर लावावं. दाराच्या उजव्या बाजूला ठेवावे. याने घरात सुख-समृद्धी आणि शांती कायम राहील.