फेंगशुईनुसार किचन टिप्स

तुमच्या किचनशी निगडित आहे तुमचे आरोग्य. आरोग्य चांगले असेल तरच तुम्ही जीवनात पुढे जाऊ शकता. फेंगशुईमुळे किचनमध्ये सकारात्मकता येते आणि कुटुंबीयांच्या प्रगतीचे मार्ग खुलतात. फेंगशुईनुसार किचनमध्ये रंग, व्यवस्था आणि दिशांचे महत्त्व आहे. आम्ही तुम्हाला सांगत आहोत किचनशी निगडित काही फेंगशुई टिप्स:
 
1. जर तुमचे किचन साउथवेस्ट भागेत असेल तर तुम्ही या दिशेत लाल, पिवळा, नारंगी किंवा गुलाबी रंग लावू शकता. पण या दिशेत पांढरा आणि ग्रे कलर लावू नये.  
 
2. किचनमध्ये गॅझेट्स कमीत कमी ठेवायला पाहिजे. जेवढे शक्य असेल किचनमध्ये ताज्या वस्तूंना जागा दिली पाहिजे.  
 
3.फेंगशुईनुसार किचनच्या पश्चिमी भिंतीत पांढरा, ग्रे रंग फारच उत्तम मानला जातो.  
 
4.जर तुमचे किचन पूर्व दिशेत असेल तर हिरवा आणि भुरा रंग तुमच्या किचनसाठी योग्य राहील.   
 
5.किचनमध्ये कधीही बेकार डब्बे आणि कुठलेही असे पदार्थ ज्यांना वास येत असेल ते ठेवणे टाळावे.  

वेबदुनिया वर वाचा