फेंगशुई प्रमाणे खांबावरील फ्लट घेण्याचे टाळावे

शनिवार, 19 एप्रिल 2014 (17:10 IST)
आजकल सर्व मोठमोठ्या शहरांतून इमारतीच्या आजूबाजूची मोकळी जागा वाचवण्याच्या दृष्टीने, कार पार्किंग साठी जागा तयार करताना खांबांवर इमारती बान्धण्याचा कल सर्वत्र दिसून येत आहे. कार-पार्कींगाच्या या मोकळ्या जागेला केवळ खांबांचाच आधार असतो. आपण या प्रकारच्या इमारतीतील पहिल्या मजल्यावरचा कोणताही फ्लट घेण्याचे टाळावे.

कारण अशा प्रकारच्या फ्लट मध्ये राहणार्‍या माणसाचे जीवन फारसे स्थिर नसते. याचे कारण म्हणजे अशा प्रकारच्या इमारतिचा पहील्या मजल्यावरील फ्लटच्या खाली मुक्त स्वरुपातील उर्जा प्रवाहित असते.

तसे पाहिले तर हा खूप गंभीर स्वरुपाचा दोष नाही; तरीसुध्दा शक्य असेल तर ही स्थिती टाळण्याचा प्रयत्न करावा. अशा प्रकारचा इमारतीत दुसर्‍या मजल्यावर किंवा त्यावरील मजल्यांवर दुसरा फ्लट आपण खरेदी करु शकता.

वेबदुनिया वर वाचा