सौंदर्य उजळविण्यासाठी नेहमी कॉस्मेटिक्सचा वापर करावा असे नाही. पूर्वीच्या काळी स्त्रिया घरातच उपलब्ध होणारी सौंदर्य प्रसाधने, काळी माती, ताक, हळद, फळांचा रस, मुलतानी माती यांचा उपयोग करीत असत. या वस्तू आजही सहज उपलब्ध होतात. तसेच त्या उपयोगीही आहेत.
बाजारातील सौंदर्य प्रसाधने महागडी असतात. त्याची खरेदी परवडण्यापलिकडे असते. अशा वेळी स्वस्तात मिळणारी सौंदर्य प्रसाधने खरेदी केली जातात. पण त्यामुळे फायदा होण्यापेक्षा नुकसान होण्याचीच शक्यता अधिक असते. त्यामुळे अशा परिस्थितीत घरच्या घरी तयार होणार्या काही सौंदर्य प्रसाधनांची माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत, ही प्रसाधने स्वस्त, शुद्ध आणि नैसर्गिक गुण असणारी आहेत. त्याचा वापर तुम्ही निःसंकोच करू शकता...
क्लिंजर:
ND
ND
चार चमचे दही व एक-दोन चमचे लिंबूचा रस एकत्र करून घ्या. कापसाच्या साहाय्याने चेहरा व मानेला खालून वरच्या दिशेला लावा आणि नंतर कापसाने पुसून घ्या. हे तेलकट त्वचेसाठी चांगले क्लिंजर आहे.
एंटिंजेंट: चार चमचे काकडीचा रस व दोन चमचे गाजराचा रस व्यवस्थित मिक्स करून घ्या. हे फ्रेशनरचे काम करते.
हँड आणि बॉडी लोशन:
ND
ND
गुलाब जल, दोन चमचे ग्लिसरीन, अर्धा चमचा सिरका, अर्धा चमचा मध, व्यवस्थित मिक्स करून एका बाटलीत भरून ठेवा. स्नानानंतर हात आणि संपूर्ण शरीरावर लावा. त्याने त्वचा स्वच्छ आणि मुलायम बनते.
हेअर डाय:
ND
ND
आवळा 25 ग्रॅम, ब्राम्ही बुटी 55 ग्रॅम, घेऊन एक लीटर पाण्यात चोवीस तास भिजवून ठेवा. एक किलो तिळाच्या तेलात हे पाणी हाताने एकजीव करा आणि गाळून तेलात टाकून इतके गरम करा की पाण्याची वाफ होऊन जाईल. (पाणी सुकून जाईल). तेल थंड करून बाटलीत भरून ठेवा.
त्याव्यतिरिक्त रोज रात्री एक-एक चमचा आवळा, हरडा आणि बेहेडा 750 मिली पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी याच पाण्याने केस व्यवस्थित धुवा. त्यानंतर तेल लावा. हे एक चांगले गुण असणारे हेअर डाय आहे.
ND
ND
कोल्ड वॅक्स: 250 ग्रॅम साखरेत सहा मोठ्या निंबूंचा रस पिळून टाका. कमी आचेवर शिजवा. गॅसवरून उतरवून त्यात एक मोठा चमचा ग्लिसरीन मिळवा. काचेच्या बाटलीत भरून ठेवा. हे वॅक्सिंगसाठी वापरा.