'सोळावं वरीस' धोक्याचं असतं, ते काही उगीच नाही. शरीरच मुलींना तारूण्याच्या या उंबरठ्याची जाणीव करून देत असते. त्यामुळे यापुढच्या काळात एक स्त्री म्हणून मुलींचा विकास होणार असतो. तारूण्याचा बहर आलेला असताना काही मुली उगीचच वयस्कर वाटतात किंवा वयापेक्षा लहान वाटतात. कारण या वयात घ्यायची काळजी त्या घेत नाही. आकर्षक दिसण्यासाठी काही प्रयत्न स्वतःहून करणे गरजेचे आहे. म्हणूनच खाली दिलेले उपाय योजा, तुम्ही तरूण रहाल आणि दिसालही तरूण.
*सकाळच्या चहाआधी आपल्या दिवसाची सुरुवात एक ग्लास कोमट पाण्यात लिंबू टाकून पिण्याने करा. पाण्यात मध टाकले तरी चालते. *मध, दही, पपई यापासून बनलेले मॉईश्चराइजर चेहर्याच्या त्वचेसाठी फायद्याचे असते. वाळलेल्या संत्र्याची साले स्क्रब म्हणून वापरता येतात. *बदाम पूडमध्ये अर्धे केळे आणि थोडे मध मिळवून पेस्ट बनवा. आणि चेहर्यावर 20 मिनिटे लावून ठेवा. *शक्यतो घरीच तयार केलेल्या उटण्यांचा वापर करावयाचा प्रयत्न करा. पाच थेंब चंदन तेलात दोन चमचे मध टाकून पेस्ट तयार करून फ्रीजमध्ये स्टोअर करा. *चेहर्याच्या त्वचेशी नखांनी खेळू नका. त्याने त्वचेला सर्वांत जास्त नुकसान होते. *वाचताना/अभ्यास करताना, टि.व्ही बघताना किंवा खाली बसलेले असताना आपण नेहमी चेहर्याला हातांचा टेकू देतो. त्याने दातांवर वाईट परिणाम होतो. *फार गरम पाण्याने स्नान करू नये. जास्त गरम पाणी आपल्या त्वचेला कोरडी बनविते. त्याने चेहर्यावर लवकर सुरकुत्या जाणवायला लागतात. *सूर्याच्या किरणांपासूनही आपल्या त्वचेला सांभाळले पाहिजे. सूर्याच्या अल्ट्राव्हॉयलेट किरणांनी त्वचेला झालेले नुकसानाची भर होणे अशक्य असते. उन्हात बाहेर निघताना आधी सनस्क्रिन क्रीम जरूर लावा. *डायटिंगचा आपल्या चेहर्यावर वाईट परिणाम होतो. वजन कमी करण्याच्या प्रयोगांमध्ये तेल आणि वसाचे प्रमाण कमी करण्याचाच सल्ला दिला जातो. नेहमी संतुलित आहार घ्या. त्यात तेल, तुपाचे प्रमाण कमी असेल. तुम्ही जे खाता ते तुमच्या चेहर्यावर दिसते. ही गोष्ट लक्षात घ्या. *मोड आलेली कडधान्ये, पालक, काकडी, फुलकोबी, टोमॅटे कच्चेच खा. हिरव्या पालेभाज्या खा. रात्री 8 वाजेनंतर जास्त कार्बोहाइड्रेट असणारे आहार घेऊ नका. *घरी किंवा ब्यूटीपार्लरमध्ये जाऊन नियमित पेडीक्योअर करा. निंबाच्या तेलाने पायांची मालीश करा. *दररोज 7-8 तास झोप अवश्य घ्या. अनिद्रेने डोळ्यांच्या खाली वर्तुळे पडू शकतात. *नियमितपणे व्यायाम/योगासने केरा. त्याने शरीरातील रक्तप्रवाह वाढतो. दररोज केलेला एक तास शारीरिक व्यायाम आपल्या शरीरालाही तंदुरुस्त ठेवतो. *चेहर्यानुसार मॉईश्चराइजर टोनर आणि क्लिनर वापरा. *चेहर्यावर फाउंडेशनचा कमीत कमी वापर करा. आवश्यक असल्यास चेहर्यावरील डाग लपविण्यासाठी कंसीलरचा वापर करा. *रात्री झोपण्याआधी कोमट पाण्यात कापूस भिजवून मेकअप पूर्ण उतरवून घ्या. चेहरा नेहमी ताज्या पाण्यानेच धुवा. रात्री केलेले त्वचेचे क्लिनिंग, टोनिंग, मॉश्चराइजर दिवसापेक्षा जास्त फायद्याचे असते. रात्री झोपताना डोळ्यांखाली बदाम तेलाची मालीश करा. त्याने डोळे सुजत नाही. डार्क सर्कल्सपासूनही बचाव केला जातो.