चाळीशी उलटल्यानंतर केस पांढरे होणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण आजच्या धावपळीच्या युगात केस अकाली पांढरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. शरीरासाठी आवश्यक असणार्या पोषक घटकांची कमतरता, एखादा जुना आजार किंवा काहीवेळा औषधे यांच्यामुळेही केस पांढरे होतात.
केस पांढरे झाले की मेंदी लावणे हा त्यावरील उपाय आहे. पण कोणती मेंदी लावावी, त्यात कोणकोणत्या वनौषधी असाव्या हे अनेकदा माहित नसते. मेंदीचे मिश्रण संतुलित नसेल तर केस शुष्क होणे आणि पांढरे होण्याचे प्रमाण अजून वाढू शकते. आपण अंदाजानेच मेंदीमध्ये वनौषधी टाकतो. पण हे प्रमाण संतुलित नसेल तर केसांसाठी ते अपायकारक ठरू शकते. जास्त काळ साठवून ठेवलेल्या वनौषधी वापरू नका. कारण त्या केसांना अपायकारक ठरू शकतात.
मेंदीत वापरण्यासाठी वनौषधींचे मिश्रण तयार करून घ्या. त्याने पांढर्या केसांना गर्द भुरा रंग तर मिळतोच सोबतच केस पांढरे होण्याचे प्रमाण देखील कमी होते. त्यात प्रमुख हरीतकी, विभीतकी, आमलकी, घृतकुमारी, जास्वंद या वनौषधी आहेत.
प्रयोगाची कृती :
ND
ND
आवश्यक तेवढे पाणी घेऊन त्यात दोन ते तीन चमचे चहा पावडर टाकून उकळवून घ्या. हे पाणी गाळून घ्या. पाणी थंड करून त्यात 2-3 चमचे मिश्रण टाका. आवश्यक तेवढी मेंदी टाकून लेप बनवून घ्या. हे मिश्रण लोखंडी भांड्यात रात्रभर ठेवून द्या. दुसर्या दिवशी सकाळी केसांच्या मुळापासून संपूर्ण केसांना व्यवस्थित लावा. दोन ते अडीच तास राहू द्या. हाताला लावतो तीच मेंदी वापरा. 'केसांना लावायची मेंदी' या नावाखाली जी मेंदी किंवा हिना मिळते तिचा वापर टाळा कारण यात धोकादायक रसायने असतात.
त्यामुळे केस पांढरे होण्याचे प्रमाण आणखी वाढते. तसेच केस शुष्क होतात. जास्त दिवस साठा करून ठेवलेली मेंदी वापरू नका. केसांची मेंदी धुण्यापूर्वी थोडा शांपू पाण्यात मिळवून केस धुऊन घ्या. चांगल्या परिणामांसाठी साध्या पाण्याने मेंदी धुऊन रात्री तेल लावून ठेवा. सकाळी गरम पाण्याने टॉवेलने वाफ घेऊन केस शांपूने धुवा. मेंदीचा प्रयोग 20 दिवसांपेक्षा कमी अंतराने करू नका. मेंदीचे मिश्रण रात्रभरापेक्षा जास्त काळ ठेवू नका.