ट्राय स्टायलिश कोट!

पारा घसरू लागला की विंटर कोट तमुच्या मदतीला येतो. हलकेफुलके विंटर कोट समस्त दोस्तमंडळींना हटके लूक देऊन जातात. विविध आकार आणि प्रकारांचे विंटर कोट बाजारात दाखल होत आहेत. तुम्हाला कोणता विंटर कोट शोभून दिसेल? जाणून घ्या. 
 
* बॉयफ्रेंड कोट हा प्रकार कोणत्याही आकारात शिवून घेता येतो. हा कोट फिटिंगलाही अगदी छान बसतो. कॅज्युअल आणि फॉर्मल्स अशा दोन्ही प्रकारच्या कपड्यांवर बॉयफ्रेंड कोट शोभून दिसतो. 
 
* थोडे जाडसर कोटही थंडीत चालून जातात. रात्री घालायच्या कपड्यांवर आणि लेअररिंगवर हे कोट उठून दिसतात. हे कोट कंबरेवर नीट बसावेत यासाठी बेल्टीही ट्राय करता येईल. 
 
* मॅक्सी कोट्स हा प्रकार कुणीही ट्राय करू शकतं. मॅक्सी कोट नावाप्रमारे बरेच लांब असतात. 
 
* थोडं स्टायलिंग अॅड करण्यासाठी व्रॅप कोट हा प्रकार तुम्ही ट्राय करू शकता. कोटचा हा प्रकार कुणावरही उठून दिसतो. या कोटला बटणं नसतात. तो फक्त बेल्टच्या मदतीने बांधायचा असतो. 
 
यंदा या कोटांपैकी एखादा प्रकार अवश्य ट्राय करून बघा...

वेबदुनिया वर वाचा