पावसाळी चपला खरेदी करताना...

गुरूवार, 24 सप्टेंबर 2020 (15:58 IST)
पावसाळी चपला आता बाजारात वेगवेगळ्या प्रकारात मिळतात. पावसात पायाला सुंदर ठेवणार्या. आणि चांगला लूक देणार्याय चपला आता सर्वत्रच दिसून येतात. त्यातीलच काही चपलांचे प्रकार निवडून पावसात चालण्याचा किंवा पावसाळी ऋतूचा आनंद घेऊ शकता.
 
रबर किंवा पीव्हीसीपासून बनवलेले फ्लिप फ्लॉप्स पावसाळ्यासाठी अगदी योग्य ठरतात. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे ते सहजपणे स्वच्छ करता येतात. ते सुकण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. सर्व बाजूंनी ते मोकळे असल्यानेपावलांना बाहेरील हवा लागते. पाय धुतल्यानंतरही पाणी आरामपणे निघून जाते. ब्राईट निऑन रंगात आणि वेगवेगळ्या प्रिंटस्‌ आणि डिझाईन्समध्ये या चपला मिळतात. या चपला बर्याहपैकी स्वस्तही असतात.
 
जर स्वस्त चपला घ्यायच्या असतील तर प्लास्टिकच्या चपलाही छान आणि वेगवेगळ्या रंगात मिळतील. यामध्ये वेगवेगळे डिझाईनही मिळतात. पावसाळ्यात क्रॉक्स हासुद्धा एक उत्तम उपाय ठरु शकतो. क्रॉक्स रबरच्या असतात. त्यामुळेच रस्त्यावर चांगली ग्रिप मिळते. पावसाळ्यात याचा एक फायदा म्हणजे आपलला भरभर चालताना स्लिप होण्यापासून बचावतो. रंगीबेरंगी आणि होल असलेल्या या क्रॉक्स हे पावसाळ्यासाठी एक चांगले स्टाईल स्टेटमेंट ठरू शकते.
 
बुटामधीलच पण पायाचा थोडासा भाग ओपन ठेवणारा पेपिटोज हा प्रकारही फॉलो करायला छान आहे. या चपला तुम्हाला वॉटरप्रूफ मटेरियलमध्ये उपलब्ध आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती