असे दिसू शकता स्मार्ट

सोमवार, 2 ऑगस्ट 2021 (23:22 IST)
सौंदर्य देवाची देणगी असली तरी स्मार्ट दिसणे आपल्या हातात असते. रंग-रूप कसेही असले तरी स्वत:कडे थोडं लक्ष दिले तर तुम्हीसुद्धा स्मार्ट बनू शकता.
 
* रंग उजळ असेल आणि उंची चांगली असेल तर गडद किंवा हलक्या रंगांचे कपडे तुम्हाला शोभतील.
* उंची कमी असेल तर स्ट्राइप्स आणि सरळ रेषांच्या कापड्यांची निवड करणे योग्य आहे. सलवार-कमीजच्या कुर्त्याची लांबी कमी ठेवल्याने तुमच्या स्मार्टनेसमध्ये भर पडेल हे निश्चित. 
* उंची कमी असेल पण तुम्हाला जीन्स घालायची इच्छा असेल तर त्यावर लहान टॉप घालायला पाहिजे. म्हणजे तुम्ही उंच आणि आकर्षक दिसाल. 
* सडपातळ असाल तर सरळ रेषांचे कपडे घालण्यास टाळा आणि डिझाइनिंग चेक्सला प्राधान्य द्या. मग पाहा कॉम्लीमेंट्‍स देणार्‍यांची रांग लागेल.
* तुमचा चेहरा जाड असेल व त्वचा उजळ असेल तर प्रिंटेड डिझाइनचे कपडे शोभतील. 
* लहान लहान एक्सेसरीजचा वापर करा. तुमच्या सौंदर्यात त्यामुळे भर पडेल. 
* रंग गोरा असेल तर गडद रंगाचे कपडे (उदा. लाल, हिरवा, निळा किंवा काळा) तुम्हाला शोभतील. 
* तुमचा रंग सावळा असेल तर एक्सेसरीज नेहमी हलक्या रंगांची असावी.
 
या प्रमाणे जर ऋतू, मोसम आणि आपल्या शरीरयष्टीकडे लक्ष ठेवून वर दिलेल्या गोष्टींकडे लक्ष दले तर तुमच्या व्यक्तिमत्वात नक्कीच चांगला बदल घडेल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती