मुरुमांपासून कायमची सुटका मिळवण्यासाठी मुरूमहारी योगासन

शुक्रवार, 16 जुलै 2021 (23:48 IST)
मुरुमांपासून कायमची सुटका जर आपल्याला करायची असेल, तर त्यावर सर्वोत्तम उपाय म्हणजे योगासन करणे होय. 
 
अत्याधु‍निक जीवनशैलीच्या आपण जरा जास्तच आहारी गेल्याने आपले खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्याचा परिणाम म्हणजे चेहर्याववर बारीक बारीक पुटकळ्यांना आमंत्रित करणे होय. याच्यावर तात्पुरता उपचार म्हणून आपण बाजारात उपलब्ध  झालेले विविध कंपन्यांचे क्रीम किंवा लोशन यांचा वापर करू शकता. मात्र मुरुमांपासून कायमची सुटका जर आपल्याला करायची असेल, तर त्यावर सर्वोत्तम उपाय म्हणजे योगासन करणे होय.
 
अशा परिस्थितीत योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने व जाहिरातींवर भुलणारा युवावर्ग बाजारात उपलब्ध झालेल्या विविध कंपन्यांचे लोशन व क्रीमचा सर्रास वापर करतात. 
 
एवढे करून देखील 'आडात नाही तर पोहर्यापत कुठून येणार?' अशी त्यांची अवस्था होते. थोडक्यात सांगायचे झाले, तर मुरूमांवर त्याचा फारसा उपयोग होत नाही. 
 
योगासन तज्ज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार यांचे मुख्य कारण म्हणजे योग्य पद्धतीने पचन न होणे. या व्यक्तिरिक्त युवावर्गात व्यायामाप्रती आळस निर्माण झाला आहे. मरुम घालविण्यासाठी योगासन हा सर्वोत्तम उपाय आहे. 
प्राथमिक उपचारात दिवसभरातून साधारण दोन ते तीन वेळा साध्या पाण्याने चेहरा धुतला पाहिजे व त्याल रुमालाने न पुसता तसाच सुखू दिल्याने चेहर्याीवरील तेलकटपणा धुतला जातो. त्यामुळे मरुम येण्याचे प्रमाण कमी होते. 
 
भुजंगासन, कुंभासन, शशकासन केल्याने नक्कीच तुम्ही त्रस्त असलेल्या मुरुमांपासून स्वत:ला मुक्त करू शकाल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती