मोनोक्रोमॅटिक लुक स्टायलिश आणि सुपर ट्रेंडी लुकसाठी सर्वोत्तम पर्याय आहे. मोनोक्रोम हि एक रंगसंगती आहे, जी बदलत्या मोसमावर आधारित नसते, तर ती रंगावर अवलंबून असते. या सीझनमध्ये क्लासिक ब्लॅक अँड व्हाईट लूकला एका वेगळ्याच पातळीवर घेऊन जाता येईल. काळ्या-पांढऱ्या रंगाचे ठिपके आणि चेकबोर्डस किंवा पट्टे मॉडर्न लुक देतात. या रंगाची रंगसंगती सहज आणि आकर्षक असल्याने ती कोणत्याही रंगाच्या व्यक्तीसाठी उठून दिसते.
ठळक रंगांचे मोनोक्रोम : टोन आऊटफिट्स पाहताच क्षणी खूप छान वाटू शकतात, विशेषत: जर ते भडक रंगाचे असतील तर, त्यासोबत अॅक्सेसरीज शोभून दिसेल अशीच असावी. जेव्हा लाल रंग ड्रेसच्या वरच्या भागावर असते तेंव्हा तेंव्हा त्यासोबत तुम्ही ब्लॅक किंवा व्हाईट रंगाचे आऊट फिट्सहि वापरू शकता. हे ठळक रंग सर्वमान्य आनंददायक आहेत आणि कोणत्याही बूट सोबत सूट होतात.
सर्वच कॅमल रंग सारखेच नसतात: काही कॅमल रंग अधिकच पिवळे असतात, तर इतरांना राखाडी रंग हि असतात. एखाद्या बॉसप्रमाणे या मोनोक्रोम ट्रेंडला तुम्ही वापरू शकता, ऑफ ब्राउन छटा शोधून काढा ज्या तुम्हाला सूट करतील आणि आपल्या इच्छेनुसार हवे ते रंग जुळवून पाहू शकता. मस्टर्ड एक उत्कृष्ट पण अत्यंत अंडररेटेड रंग आहे. डोक्यापासून ते पायापर्यंत तुम्ही मखमली रंगाची शेड सुद्धा वापरू शकता.
आपले आवडते रंग निवडणे आणि त्यांचा वापर करणे किंवा त्यांच्याबरोबर प्रयोग करणे हे अत्यंत महत्वाचे आहे. पोत समाविष्ट करणे आणि विशिष्ठ आराखड्यात बनविल्या गेलेल्या भिन्न प्रकारांच्या कापडामुळे खोली, माप, विशिष्टता आणि रुची वाढविण्यात मदत होऊ शकते. इथे आणि तिथे सर्वत्र असलेल्या या ट्रेंडसह आपण सहजपणे प्रयोग करू शकता जस कि, लेस, लेदर, फर, पंख, भरतकाम, पॅटर्न्स, सजावट इत्यादी. मोनोक्रोमॅटिक ट्रेंड स्ट्रीट फॅशन आणि पार्टी मध्ये सुद्धा आपली वेगळी छाप पडण्यास मदत करते, आता महत्त्वपूर्ण हे आहे कि तुम्ही कशाप्रकारचे रंग संगती निवडता.