हिवाळ्याचे दिवस सर्वांनाच आवडतात या ऋतुमध्ये लग्न, पार्टी यांची मज्जा काही औरच असते. पण जास्त हिवाळा महिलांसाठी समस्या उभी करतो . कारण या हंगामात महिला लग्न समारंभाच्या वेळी महागडे आणि स्टाइलिश एथनिक पार्टी वियर कपडे परिधान करतात. पण थंडी वाढल्याने त्यांना स्वेटर किंवा कोट घालून स्वताला कॅरी करावे लागते. अशात त्यांचे सुंदर ड्रेस स्वेटरच्या खाली झाकले जातात . जर त्यांनी स्वेटर घातले नाही तर थंडीचा त्रास होऊ शकतो. हिवाळ्यात लग्नसमारंभात जाण्यासाठी काही अशा टिप्स जाणून घ्या जेणे करून साडीला स्टाइलिश पद्धतीने कसे नेसायचे व थंडीपासून कसा बचाव होईल हे जाणून घेऊ या.
फुल स्लीव्स ब्लाउज घालणे-
थंडीपासून बचाव करण्यासाठी तुम्ही ब्लाउजच्या स्टाइलची निवड करतांना लक्षात ठेवा की ब्लाउज फुल स्लीव्सचे असावे. फुल स्लीव्स ब्लाउज फॅशन अनुसार ट्रेंड मध्ये आहे.
इंडो वेस्टर्न साडी नेसणे-
थंडीच्या दिवसात तुम्ही इंडो वेस्टर्न साडी कॅरी करू शकतात.ही एथनिक लुकला मॉडर्न टच देण्यासह थंडीपासून बचाव करेल. यांत तुम्ही पैंट स्टाइल साडी देखील परिधान करू शकतात.